इयत्ता 10 वी व इ.12 वी बोर्ड परीक्षेची संभाव्य तारीख व त्यावरील हरकती बाबत परिपत्रक ssc hsc board exam sambhavya date
इयत्ता दहावी व बारावी संभाव्य वेळापत्रक व हरकती बाबत खालील प्रपत्रक पहा
अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत रीत्या जाहीर झालेले नाही.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.
त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासकमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी इ.१२वी व इ.१० वीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजित आहे.
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या वरीलप्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
सदर तारखांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या शुक्रवार, दि.२३.०८.२०२४ पर्यंत secretary.stateboard@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
परीक्षा बद्दल विद्यार्थ्यांनी भीती बाळगू नये
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा विषयी भीती असते ती भीती दूर करण्यासाठी शासन स्तरावरून सूचना देण्यात आलेले आहेत भयमुक्त परीक्षा होणार आहेत परीक्षेमध्ये येणारे अडचणी या शासन स्तरावर दूर केल्या जाणार आहेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जास्तीत जास्त वेळ दिला जाणार आहे तसेच याबाबतीत पालकांनी देखील विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.सर्व शिक्षकांना देखील सूचना देण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करून त्यांचे उपदेशान चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे.
कॉपीमुक्त परीक्षा प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे
कॉपीमुक्त परीक्षेसाठी सर्वच केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे व सरमिसळ पद्धत अवलंबली जाणार आहे. .
परीक्षेच्या कालावधीत या गोष्टी करू नका
➡️विद्यार्थ्यांनी मोबाइलपासून दूर राहावे.
➡️रात्री जागरण करू नये
➡️ शिळे अन्न ग्रहण करू नये
➡️ तासनतास एकाच ठिकाणी बसू नये
➡️हे आवश्यक अभ्यासाचे वेळापत्रक
➡️ नियमित पेपर सोडवून पाहा
➡️पोषक आहार घ्या
➡️अभ्यासासोबत थोडे मनोरंजनही करा