उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम 2024-25 अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी घ्यावयाच्या उपक्रमाबाबत ullas navbharat saksharta karykram 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम 2024-25 अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी घ्यावयाच्या उपक्रमाबाबत ullas navbharat saksharta karykram 

संदर्भ:- 1. शासन निर्णय क्रमांक: नभासाका-0322/प्र.क्र.39/एस.डी.2, मंत्रालय मुंबई-32 दि.14/10/2022

2. शासन निर्णय क्रमांक: नभासाका-0322/प्र.क्र39/एस.डी. 2, मंत्रालय मुंबई-32 दि. 25/01/2023

3. मा. शिक्षण संचालक पुणे यांचे पत्र जा.क्रं. शिसंयो/योजना-3/नभासाका/प्रचार-प्रसार / 02259 / 2024-25 दिनांक:-25/10/2024

4. मा. शिक्षण संचालक पुणे यांचे पत्र जा.क्रं. शिसंयो/योजना-3/नभासाका/प्रचार-प्रसार/02351/ 2024-25 दिनांक:-13/11/2024

उपरोक्त संदर्भ क्रं.। अन्वये सन 2011 च्या जणगणनेनुसार, राज्यातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. राज्यातील 2023-24 साठी 6,20,000 व सन 2024-25 साठी 6,20,000 असे एकुण 12,40,000 इतके असाक्षर नोंदणी उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. त्यापैकी दिनांक 17 मार्च 2024 रोजी झालेल्या FLNAT परीक्षेत 4,25,906 इतके असाक्षर आता नवसाक्षर झाले आहेत.

संदर्भ क्रं-2 नुसार सन 2022 ते 2027 पर्यंत चालणाऱ्या उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय/जिल्हास्तरीय/गटस्तरीय शाळा स्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यातील जिल्हास्तरीय समितीमध्ये मा. जिल्हाधिकारी जालना हे नियामक परिषदेचे अध्यक्ष म्हणुन व कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणुन मा.मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना हे कामकाज पाहात

आहेत.

संदर्भ क्रं-3 नुसार मतदान साक्षरता जनजागृतीसाठी शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर व्हिडीओ निर्मिती व पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करणे बाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. या दोन्ही स्पर्धा प्रकारामध्ये सहभागी होण्यासाठी या पत्रासोबत दिलेला फॉर्म गटशिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यातील संबंधीत सर्व शाळांना दिनांक 18/11/2024 पर्यंत देण्यात यावा. तसेच ज्या स्पर्धकांनी व्हिडीओ निर्मिती केली आहे. त्यांनी दिनांक 18/11/2024 रोजी सायं. 5:00 वाजेपर्यंत सदर व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर (यु-ट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम इ.) अपलोड करणे आवश्यक आहे. शाळा, तालुका व जिल्हा स्तरावर दोन्ही स्पर्धा प्रकारामध्ये प्रथम पाच क्रमांक कादुण प्रमाणपत्रे विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ची आचारसंहिता संपल्यानंतर,

Scanned with OKEN Scanner

जिल्हास्तरावरुन वितरीत करणे आहे तसेच प्रत्येक जिल्हयातुतन प्रथम क्रमांकाच्या व्हिडीओची लिंक व पत्रलेखन शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे। या कार्यालयास सादर करणे आहे. करीता जालना जिल्हयातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी वरील सर्व बाबीचे पालन करुन आपल्या अधिनस्त सर्व शाळांकडून व्हिडीओ निर्मिती व पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करुन घ्यावे, व विद्यार्थाचे व्हिडीओ निर्मिती व पत्रलेखन हे दि.25/11/2024 पर्यंत शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद, जालना या कार्यालयात सादर करावे.

सोबतः- स्पर्धेचा अहवाल (फॉर्म)

👉👉मतदान जनजागृती अभियानांतर्गत घ्यावयाचे उपक्रम शासन निर्णय येथे पहा