सुंदर लेख..तुम्ही शाळेत काय होता त्यापेक्षा पुढे आयुष्यात तुम्ही काय कमावलं ह्याला जास्त महत्त्व motivational sundar lekha 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुंदर लेख..तुम्ही शाळेत काय होता त्यापेक्षा पुढे आयुष्यात तुम्ही काय कमावलं ह्याला जास्त महत्त्व motivational sundar lekha 

तुम्ही शाळेत काय होता त्यापेक्षा पुढे आयुष्यात तुम्ही काय कमावलं ह्याला जास्त महत्त्व. दुर्दैवाने आमच्या शालेय जीवनात हुशार अन् ढ विद्यार्थी ही विषमता त्या काळातील काही शिक्षकांनीच अस्तित्वात आणली होती, ही शोकांतिका म्हणावी लागेल. तसे बघितल्यास शिक्षकांना सर्व विद्यार्थी सारखेच, पण तेंव्हा तसे नव्हते.

पाची बोट सारखी नसतात पण प्रत्येक बोटाला एक आगळं वेगळं महत्त्व असतं, तसेच शालेय विद्यार्थ्यांचं असत, पण ते शिक्षकांना ओळखायचं असत. कोणाला “ढ” संबोधून कोणी स्वतः ची पाठ थोपटून घेणं योग्य नाही. शिक्षकांना विद्यार्थी घडवायचे असतात, ज्यांच्यात काही कारणास्तव कमतरता असेल तर ती दुर करून अशांचे मनोबल वाढवायचं असत, जे दुर्दैवाने होत नव्हतं, अशा अभ्यासात कमजोर विद्यार्थ्यांचा भर वर्गात मजाक उडविण्यात शिक्षक धन्य समजायचे, जे दुर्दैवी होत, काही अपवाद सोडल्यास. हीन भावनेमुळे कित्येक विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून लहान वयात जीवन संपविण्याच्या घटना घडलेल्या आहेत, ह्याला जबाबदार कोण? आता ह्या बाबतीत तरी बदल झाला असावा. आता शालेय परीक्षांच्या निकालपत्रात ग्रेड दिले जातात ते स्तुत्य.

शाळेत सर्वच विद्यार्थी एकसमान हुशार असु शकत नाही, काहींचा कल इतर क्षेत्रात असतो, कोणाला खेळात रुची असते, कोणाच्या घरी काही समस्या असतील, अशा वेळेस कोणी अभ्यासात कमी पडत असेल तर त्याला हीणवू नये, पण नेमक अशांना हीणवल जायचं.

असे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांची गणना शाळेत हुशार विद्यार्थ्यांमध्ये नसायची (शिक्षकांच्या नजरेत) पण पुढे आयुष्यात उत्तम यशस्वी झालेले बघायला मिळतात, अशांना तुम्ही शाळेत कसे होता कोणी विचारत नाही ह्याची काहींनी नोंद घ्यावी.

आपली शैक्षणिक व्यवस्था भरकटलेली आहे, पूर्वी तर फार होती. हुशार अन् ढ हे शब्द आज हद्द पार झालेत, पण अजूनही दुर्दैवाने काही माजी विद्यार्थी / विद्यार्थिनी, शिक्षक त्याच दुनियेत वावरतांना दिसतात. आयुष्यात आज तुम्ही काय आहात, काय कमावलं ह्याला महत्त्व, तुम्ही शाळेत कसे होता ह्याला कवडीची किंमत नसते.

आज सामाजिक, आर्थिक विषमता सर्वत्र बघायला मिळते, त्यात शैक्षणिक विषमतेची भर न पडो हीच सरस्वती देवीच्या चरणी प्रार्थना.

शिक्षकांसह सर्वांना एकच कळकळीची विनंती हीच की शैक्षणिक विषमता थांबवा, त्याला बळ देवू नका. विद्यार्थ्यांचे खच्चीकरण न करता त्यांचे मनोबल वाढवा, त्यांच्यातील कमतरता दुर करा.

संकलन A.K.PATIL