विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत उपलब्ध करुन देण्याबाबत homeguard service for child protection
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरु होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय / स्थानिक स्वराज्य/खाजगी संस्थांच्या जिल्हा परिषद शाळेत उपलब्ध करुन देण्याबाबत.
संदर्भ :
१. डॉ. प्रतापराव मोहिते-पाटील, सदस्य, श्रम व रोजगार मंत्रालय, दिल्ली यांचे पत्र क्र.३२९/VIP/PM/TP/२०२४-२५, दि.०८.१०.२०२४
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. बैठक २०२४/प्र.क्र.२४६/एस.डी.-४, दि.२३.०८.२०२४
हे ही वाचा
👉माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन व सनअग्रीम वितरित करणे बाबत शासन परिपत्रक
👉सन 2024-25 या वर्षातील दिवाळी (२० दिवस) सुटयाबाबत वेळापत्रक जाहीर
👉संचमान्यता महत्त्वपूर्ण शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2024
👉प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण ब्लेंडेड मोड कोर्स करणे सक्तीचे
👉ऑनलाइन निवडणूक प्रशिक्षणाबाबत शासन निर्णय
👉इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय सुरक्षा २०२४/प्र.क्र.२८४/एस.डी.-४, दि.१९.०९.२०२४
४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय सुरक्षा २०२४/प्र.क्र.२८४/एस.डी.-४, दि.२३.०९.२०२४
५. आपले पत्र क्र. प्राशिसं ८०२/विसुरक्षा/२०२४/६४२६, दि.०३.१०.२०२४
महोदय,
उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भीय पत्राचे कृपया अवलोकन व्हावे. (प्रत संलग्न)
संदर्भीय पत्रात कळविलेनुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत घडलेल्या घटना लक्षात घेऊन घटनेची पुनरावृत्ती होऊ नये या करिता पोलीस प्रशासनाला वेळो वेळी मदत करणारे महाराष्ट्र होमगार्ड यांची नियुक्ती सर्व प्राथमिक व खाजगी शाळांवर केल्यास होणाऱ्या घटनांना आळा बसेल. याबाबत कार्यवाही करण्याचे, कळविले आहे.
तरी, विद्यार्थीच्या सुरक्षिततेबाबत संदर्भ क्र.५ दि.०३.१०.२०२४ अन्वये गठित समितीच्या कार्यकक्षेमध्ये सदर बाब समाविष्ट करुन संचालनालय स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही व्हावी, ही विनंती
विद्यार्थी सुरक्षा होमगार्ड नेमणूक बाबत शासन निर्णय परिपत्रक येथे पहा