विधानसभा निवडणूक 2024 अचार संहितेचा भंग केले बाबत vidhansabha code of conduct
विधानसभा निवडणूक 2024 लोहा/कंधार अचार संहितेचा भंग केले बाबत
संदर्भ :- 1. मा. निवडणुक निर्णय अधिकारी 88 लोहा विधानसभा मतदारसंघ यांचा दुरध्वनी संदेश
दिनांक 20/10/2024. 2. मा. तहसिलदार, तहसिल कार्यालय, लोहा यांचा दुरध्वनी संदेश दिनांक 20/10/2024.
आपणास सूचित करण्यात येते की, विधानसभा निवडणूक 2024 संदर्भाने आचार संहिता लागु झाली आहे. सदर आचार संहितेचे काळात कोणत्याही पदाधिका-याचा किंवा पक्षाचा प्राचार करणे किंवा त्यांचा सत्कार करणे हा आचार संहिता संहितेचा भंग आहे.
दिनांक १९/१०/२०२४ रोजी नांदेड येथे एका राष्ट्रीय पक्ष्याचा कार्यक्रमात खासदार व आमदारांना शुभेछा देताना आपला फोटो वायरल झाला आहे. एका राष्ट्रीय पक्ष्याचा कार्यक्रमात खासदार व आमदारांना शुभेछा देताना आचार संहितेचा भंग केल्याचे निदर्शनास येत आहे.”
तरी आचार संहितेचा भंग केल्यामुळे आपल्यावर प्रशासकिय कारवाई का अनुसरण्यात येवु नये
याबाबताचा खुलासा उदया दिनांक 21/10/2024 रोजी माझ्या समक्ष सादर करावा. खुलासा असमाधानकारक
असल्यास किंवा अप्राप्त असल्यास आपले काही म्हणणे नाही असे समजुन आपला शिस्तभंगाचा प्रस्ताव वरिष्ठ
कार्यालयास सादर करण्यात येईल यांची गांर्भीयाने नोंद घ्यावी.