राज्यातील सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करणेबाबत sainiki school
संदर्भ: शालये शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक इसैशा-२०२०/प्र.क्र.-३४/एसएम-६ दिनांक ०९ ऑक्टोबर, २०२४.
शासन शुद्धिपत्रकः
उपरोक्त नमुद संदर्भाधीन शासन निर्णयात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे.
१) वाचा मधील क्र.४ चे
“शासन परिपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांक इसैशा २०१७/प्र.क्र. १८३/एसएम-६, दिनांक २४ डिसेंबर, २०२०”
या ऐवजी
“शासन परिपत्रक, शालेय शिक्षण विभाग, क्रमांक इसैशा २०२०/प्र.क्र. १७८ (भाग-२)/एसएम-६, दिनांक २४ एप्रिल, २०२०”
असे वाचावे.
२) परिच्छेद आ) च्या मुद्या क्र.६ येथील राज्य सैनिकी शाळा मंडळाची संरचना मधील “उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालय, पुणे”
या ऐवजी
“राज्य सैनिकी मंडळ सदस्य सचिव- शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च
माध्यमिक), माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे”
असे वाचावे.
२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१४१८०४००७७२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,