सन २०२४-२५ अंतर्गत इ.४ थी व इ.७ वी विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा संपुर्ण अभ्यासक्रम व गुणदान तक्ता pradnya parikasha abhyaskram
जि.प सेस योजना २०२४-२५ अंतर्गत जि प शाळेतील इ.४ थी व इ. ७ वी विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित केलेबाबत.
उपरोक्त विषयान्वये जिल्हयातील प्राथमिक शाळेतील विद्याथ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिष्यवृत्ती व सर्व स्पर्धा परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये इ.४थी व इ. ७ वीतील विद्याध्यर्थ्यांना प्रोत्साहन मिळणेसाठी प्रज्ञाशोध परीक्षा आयोजीत करण्यात येणार आहे त्यासाठी खालील तक्त्यात नमुद गुणदानाचे अवलोकन करावे सदरहु परीक्षेसाठी सोबत दिलेल्या आराखड्यानुसार इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी विद्यार्थ्यांचा सराव अभ्यास दैनंदिन अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत घेण्यात यावा.
सदर उपक्रमात जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक आहे व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची शाळास्तरावर परीक्षा होउ, न त्यातून चाचणी पद्धतीने प्रतिशाळा प्रथम तीन विद्यार्थी याप्रमाणे निवडलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जिल्हयातील नियुक्त केंद्रावर घेण्याचे नियोजित आहे.
सदर प्रज्ञाशोध परीक्षा गुणदान योजनाखालील प्रमाणे,
इयत्ता चौथी इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रम व गुणदान नियोजन परिपत्रक येथे पहा