पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानसाठी १०० दिवसाच्या निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमाची अंतिम चाचणी घेण्याबाबत fundamental literacy and numericy test 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानसाठी १०० दिवसाच्या निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमाची अंतिम चाचणी घेण्याबाबत fundamental literacy and numericy test 

उपरोक्त विषयान्वये जिल्हा परिषद पुणे, प्राथमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त नियोजनातून शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीपासून पायाभूत साक्षरता व सख्याज्ञान विकासासाठी नियोजनबद्ध काम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून १०० दिवसाचा निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम दिनांक २४ जून २०२४ पासून सुरु करण्यात आला. या कार्यक्रमच्या सुरवातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतली, त्यानुसार विद्यार्थी स्तर ठरवले गेली. त्यानुसार १०० दिवसाचा FLN कार्यक्रम शिक्षकांनी वर्गात राबविला आहे. या १०० दिवसांनंतर विद्यार्थ्यांची झालेली प्रगती जाणून घेण्यासाठी उत्तर मुल्यांकन बाचणी दिनांक १० आणि ११ ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजित करावी व आपल्या स्तरावरून सर्व मुख्याध्यापकांना सूचित करण्यात यावे.

शिक्षक जबाबदारीः-

शाळेतील इ.१ ली ते ५ वी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन साधन वापरावे.

इयत्ता १ ली साठी स्तर १, इयत्ता २ री साठी स्तर २ आणि इयत्ता ३ री ते ५ वी साठी स्तर ३ चे मूल्यमापन साधन वापरावे.

प्रत्येक विद्याथ्यांचे स्वतंत्र मूल्यमापन शिक्षकाने करावे,

प्रत्येक प्रश्न हा वेगवेगळी क्षमता मोजत असल्याने प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची नोंद वर्गस्तर प्र पत्रामध्ये करावी.

विद्यार्थीस्तर निश्चित करण्यासाठी भाषा आणि गणित विषयाचे निकष

विद्यार्थ्यांच्या प्रश्ननिहाय नोंदी वर्गस्तर प्रपत्रामध्ये ज्याठिकाणी केल्या आहेत त्याच्या समोरच

आपणास विद्यार्थीस्तर नोंद (१,२,३) करायचा आहे.

चार किंवा चार पेक्षा जास्त प्रश्न विद्याथ्यनि अचूक सोडवले () असतील तर तो विद्यार्थी स्तर तीनवर नोंदवावा.

उत्तर न दिल्यास किंवा चुकीचा प्रतिसाद दिल्यास रकाना रिकामा सोडावा.

तीन प्रश्न अचूक सोडवले तर स्तर दोनवर नोंद करावी.

तीन पेक्षा कमी प्रश्न म्हणजेच १ किंवा २ प्रश्न अचूक सोडवले तर स्तर एकवर नोंद करावी.

सर्व प्रश्न अचूक सोडवले तर निपुण स्तरावर नोंद करावी.

मुख्याध्यापक सूचना :-

१०० टक्के विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होईल या बाबत मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. वर्गस्तर प्रपत्राम्ध्ये शिक्षकांनी केलेल्या नोंदी अचूक आहेत का? याची खात्री करावी.

जिल्हास्तरावरुन देण्यात येणाऱ्या प्रपत्राचा वापर करावा.

जिल्हास्तरावरून माहिती / डेटा संकलनासाठी शिक्षणाधिकारी हे शाळांना निर्देश देतील. उपरोक्त नुसार गटशिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शाळांना निर्देश देण्यात यावे,