विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना/अभिप्राय मागविणे students protection instructions response
राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करणेबाबत समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना / अभिप्राय मागविणे
संदर्भ
: १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: बैठक २०२४/ प्र.क्र.२४६/एस.डी.-४ दिनांक २३.०८.२०२४
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: सुरक्षा २०२४/ प्र.क्र.२८४/एस.डी. -४ दिनांक १९.०९.२०२४
३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: सुरक्षा २०२४/
प्र.क्र.२८४/एस.डी. -४ दिनांक २६.०९.२०२४
४. या कार्यालयाचे समक्रमांक ६४२५ दिनांक ०३.१०.२०२४
राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय / परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मा. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सु-मोटो याचिका क्र ०१/२०२४ च्या अनुषंगाने दिनांक ०३.०९.२०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक ३ अन्वये दिनांक १९.०९.२०२४ अन्वये गठीत केलेल्या समितीचा विस्तार व कार्यकक्षेबाबतची निश्चिती केली आहे. त्यानुसार समितीची विद्याथ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या शिफारशीचा अहवाल दोन महिन्यांच्या आत शासनास सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. संदर्भ क्र ३ मधील निर्देशानुसार समितीची बैठक दिनांक ०१.१०.२०२०४ रोजी आयोजित करण्यात आलेली होती.
दिनांक ०१.१०.२०२४ रोजी समितीच्या बैठकीमध्ये मा. अध्यक्ष यांनी विषयांकीत प्रकरणी दिलेल्या सूचनेनुसार समाजातील विविध घटकातून विद्याथी सुरक्षाबाबत सूचना/अभिप्राय मागविण्यासाठी कार्यालयाने नागरीकांसाठी https://forms.gle/JDcKbVaouhc7A5BT7 या लिंकवर सूचना / अभिप्राय देण्यासाठी आवाहन केलेले आहे. या लिंकवर अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी हा दिनांक ०४.१०.२०२४ ते १२.१०.२०२४ रोजी असा आहे. सदर माहितीस विनामुल्य जाहीर प्रसिध्दी राज्य/विभाग/जिल्हा स्तरावर वर्तमानपत्रात प्रसिध्दी देण्यासाठी मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क कार्यालय, मुंबई यांना संदर्भ क्र ४ अन्वये विनंती केली आहे. आपणास कळविण्यात येते की, आपणही समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना
/ अभिप्राय मागविण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरीकांना https://forms.qle/JDcKbVaouhc7A5BT7
या लिंकवर सूचना/ अभिप्राय देण्यासाठी नागरीकांना आवाहन करावे.