विद्यार्थाचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करणे बाबत Mission Registration Of Young Voters Mega Campaign

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थाचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करणे बाबत Mission Registration Of Young Voters Mega Campaign

या अभियानांतर्गत दि. 09 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हातील प्रत्येक महाविद्यालयातील वय वर्षे 18 पूर्ण असलेल्या विद्यार्थाचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करणे बाबत

परिपत्रक

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय जालना जाक्र/विधानसभा निवडणूक कावी-04/2024 दिनांक 03/10/2024.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मा. मुख्य निवडणूक आयुक्त, मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी 28 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या आयोजित आढावा बैठकीत नवमतदार नाव नोंदणी व शंभर टक्के मतदान करणे बाबत निर्देशित केले आहे. त्याअनुषगाने दिनांक दि. 09 ऑक्टोबर 2024 रोजी Mission

Registration Of Young Voters-Mega Campaign या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील वय वर्ष 18 पूर्ण असलेल्या विद्यार्थाचे नाव मतदार यादीत नोंदविणेसाठी विशेष शिबीराचे आयोजन आपल्या महाविद्यालयात करावे. सदरील विशेष मतदार नाव नोंदणी शिबीरा दरम्यान वय वर्षे 18 पुर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मतदारयादीत नाव नोंदणीसाठीचा नमूना अर्ज क्र.6 भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांची राहील. या विशेष शिबीराच्या दिवशी प्रत्येक महाविद्यालयात किमान दोन BLO ची नियुक्ती तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी करावी. सदरील BLO यांनी त्यांना नेमुन दिलेल्या महाविद्यालयात उक्त दिवशी उपस्थित राहून पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाईन / ऑफलाईन मतदार नोंदणी पूर्ण करावी. सदर मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सदरील महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करावे,

ज्या महाविद्यालयांच्या पात्र विद्यार्थ्यांच्या तुलनेत मतदार नोंदणीची टक्केवारी 90 टक्क्यांच्या वर राहील अशा महाविद्यालयाचा अहवाल जिल्हयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदरील शिबीराच्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी जालना, पोलीस अधीक्षक जालना, सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सर्व तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी पंचायत समिती, जिल्हा जालना यांनी सदर शिबीराच्या ठिकाणी भेटी देऊन नवमतदारांचा आणि शिबीरातील कर्मचारी यांचा उत्साह वाढवावा,

तहसिलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्यांच्या मतदारसंघातील महाविद्यालयांची संख्या, पात्र विद्यार्थी संख्या विचारात घेऊन आवश्यक असणारे फॉर्म 06 दिनांक 07/10/2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून हस्तगत करून पुढील आवश्यक नियोजन करावे.