मराठी महिन्यांतील सण आणि उत्सव marathi festival name marathi month
चैत्र महिन्यातील सण
चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच ‘गुढीपाडवा’ या दिवशी घरोघरी गुढ्या उभारतात. या दिवसापासून भारतीय नवीन वर्ष सुरु होते. याच महिन्यांत रामनवमी आणि हनुमान जयंती येते.
वैशाख महिन्यातील सण
शुध्द तृतीयेला ‘अक्षय तृतीया’ म्हणतात. या महिन्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ जयंती साजरी करतात.
ज्येष्ठ महिन्यातील सण
वटपौर्णिमा येते. सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात.
आषाढ महिन्यातील सण
‘आषाढी एकादशी’ या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते.
श्रावण महिन्यातील सण
या महिन्यात ‘नागपंचमी'” ‘नारळी पौर्णिमा’, ‘रक्षा बर्धन’, ‘गोकुळ अष्टमी’, पोळा (बैल) येतो.
भाद्रपद महिन्यातील सण
या महिन्यात ‘गणेशचतुर्थी’ आणि ‘अनंतचतुर्दशी’ येते.
आश्विन महिन्यातील सण
‘नवरात्र’ उत्सव आणि शुध्द दशमीला दसरा येतो. ‘कोजागिरी पौर्णिमा’ आणि शेवटच्या दिवशी दिवाळीचा मोठा सण येतो.
कार्तिक महिन्यातील सण
पहिल्या दिवशी ‘बलिप्रतिपदा’, दुसऱ्या दिवशी ‘भाऊबीज’ येते, कार्तिकी एकादशी, ‘तुळसी विवाह’ आणि त्रिपुरा पौर्णिमा याच महिन्यात येते.
मार्गशीर्ष महिन्यातील सण
‘देवदिवाळी’ आणि ‘दत्तजयंती’ येते.
पौष महिन्यातील सण
मकर संक्रांत’ येते. स्त्रिया तिळगूळ समारंभ करतात.
माघ महिन्यातील सण
‘गणेश जयंती’ आणि ‘महाशिवरात्र’ येते महाशिवरात्रीला शंकराची उपासना करतात.
फाल्गुन महिन्यातील सण
पौर्णिमेला ‘होळी’ आणि वद्य पंचमीला ‘रंगपंचमी’ येते. लोक रंग उडवून सण साजरा करतात.