राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सूचना / अभिप्राय गुगल ड्राईव्ह लिंक वर भरणेबाबत child protection response 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सूचना / अभिप्राय गुगल ड्राईव्ह लिंक वर भरणेबाबत child protection response 

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करणेबाबत समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना / अभिप्राय मागविणे

शासन निर्णय येथे पहा clickhere

राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय / परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मा. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सु-मोटो याचिका क्र ०१/२०२४ च्या अनुषंगाने दिनांक ०३.०९.२०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक ३ अन्वये दिनांक १९.०९.२०२४ अन्वये गठीत केलेल्या समितीचा विस्तार व कार्यकक्षेबाबतची निश्चिती केली आहे. त्यानुसार समितीची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या शिफारशीचा अहवाल दोन महिन्यांच्या आत शासनास सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. संदर्भ क्र ३ मधील निर्देशानुसार समितीची बैठक दिनांक ०१.१०.२०२०४ रोजी आयोजित करण्यात आलेली होती.

दिनांक ०१.१०.२०२४ रोजी समितीच्या बैठकीमध्ये मा. अध्यक्ष यांनी विषयांकीत प्रकरणी दिलेल्या सूचनेनुसार समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना/अभिप्राय मागविण्यासाठी कार्यालयाने नागरीकांसाठी https://forms.gle/JDcKbVaouhc7A5BT7 या लिंकवर सूचना / अभिप्राय देण्यासाठी आवाहन केलेले आहे. या लिंकवर अभिप्राय नोंदविण्याचा कालावधी हा दिनांक ०४.१०.२०२४ ते १२.१०.२०२४ रोजी असा आहे. सदर माहितीस विनामुल्य जाहीर प्रसिध्दी राज्य/विभाग/जिल्हा स्तरावर वर्तमानपत्रात प्रसिध्दी देण्यासाठी मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क कार्यालय, मुंबई यांना संदर्भ क्र ४ अन्वये विनंती केली आहे.

विद्यार्थी सुरक्षा बाबत नागरिकांना अभिप्राय नोंदवण्यासाठी गुगल ड्राईव्ह लिंक

आपणास कळविण्यात येते की, आपणही समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना / अभिप्राय मागविण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरीकांना https://forms.gle/JDcKbVaouhc7A5BT7 या लिंकवर सूचना / अभिप्राय देण्यासाठी नागरीकांना आवाहन करावे.

शाळा व शालेय परिसर तसेच विद्यार्थी वाहतूकीदरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो कायदा) कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सूचना करणे.

शाळा व शालेय परिसर तसेच विद्यार्थी वाहतूकीदरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ (पोक्सो कायदा) कायद्यांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी

👉👉👉प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे पत्र येथे पहा click here