सन २०२४-२५ थकीत वेतन शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन सादर करणेबाबत शासन निर्णय thakit online bill sadar
संदर्भः
१. शासन निर्णय क्र. संकीर्ण२४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प दि.१५.७.२०२१७
२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-२०१/थकीत वेतन/२०२१/३०७०/दि.४.८.२१
३. दिनांक ६.६.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचना
४. दिनांक ३.९.२०२४ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचना
५. या कार्यालयाकडील प्राशिसं/अंदाज-२०३/चकीतशाओं/२०२४/६०९४ दिनांक १२.०९.२०२४
उपरोक्त विषयास अनुसरुन संदर्भाकित क्रं. १ च्य शासन निर्णयानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीद्वारा ऑनलाईन पध्दतीनेच सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता घेणेबाबत या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक ५ अन्वये यापूर्वी कळविण्यात आलेले आहे.
हे ही वाचा
👉थकीत वेतन बिले ऑनलाईन काढणे बाबत
👉विद्यार्थी सुरक्षा काटेकोर अंमलबजावणी करणे बाबत
👉बीएलओ या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत
👉तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक
👉तक्रारपेटी सखी सावित्री समिती सीसीटीव्ही बसविल्याशिवाय वेतन आदान न करणे बाबत
तथापि, सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही. तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळणेबाबत राज्यातील काही वेतनपथक कार्यालयाकडून विनंती करण्यात आलेली आहे.
उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता डीडीओ-१ (मुख्याध्यापक) स्तरावरुन थकीत देयके ऑनलॉईन सादर करण्यासाठी दिनांक ५/१०/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तदनंतर सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही, याची नोंद घ्यावी.