समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या मानधनाबाबत special teacher mandhan
प्रस्तावना :-समग्र शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत विशेष शिक्षकांना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात रु.२१,५००/- प्रतिमाह इतके मानधन मंजूर होते. समग्र शिक्षा अभियानाच्या सुधारित आराखड्यानुसार सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून प्रति शिक्षक प्रति माह रु.२०,०००/- इतके मानधन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत विशेष शिक्षकांना रु.२१,५००/- प्रति माह याप्रमाणे मानधन मंजूर करण्यास तसेच प्रति शिक्षक रु.१५००/- प्रतिमाह फरकाची रक्कम राज्य निधीमधून अदा करण्यासाठी रु.३५०.२८ लक्ष इतका निधी दरवर्षी राज्य हिश्श्याच्या प्रमाणाबाहेर उपलब्ध करुन देण्याच्या प्रस्तावास विभागाच्या दि.०२.०८.२०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात १७७५ विशेष शिक्षकांना प्रति शिक्षक रु.१५००/- याप्रमाणे वार्षिक रु.१८,०००/- याप्रमाणे एकूण रु.६,३९,००,०००/- इतका निधी वितरीत करण्यास दि.१०.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी संदर्भ क्र.२ येथील पत्राच्या अनुषंगाने समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष शिक्षकांच्या मानधनातील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी रु.३,१९,५०,०००/- इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
हे ही वाचा👇
👉सन 2024 दिवाळी सुट्टी या वर्षी वीस दिवस असणार
👉नियतकालिक मूल्यमापन चाचणी PAT-2 शासन परिपत्रक
👉 थकीत वेतन बील ऑनलाईन सादर करणे बाबत
👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साहित्य खरेदी बाबत gr
👉शाळा मान्यता/दर्जावाढ/नवीन वर्ग मान्यता साठी निकष व तपासणी सूची शासन निर्णय
शासन निर्णय :-
समग्र शिक्षा अभियानाच्या अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत प्राथमिक स्तरावर कार्यरत १७७५ विशेष शिक्षकांना सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात विशेष शिक्षकांच्या मानधनातील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी रु.३,१९,५०,०००/- (रु. तीन कोटी एकोणवीस लक्ष पन्नास हजार फक्त) इतका निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांना वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय क्रमांकः समग्र २०२२/प्र.क्र.२८९/ एसडी-१
२. सदर खर्च सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात “मागणी क्र. ई-२, १०६, शिक्षक आणि इतर सेवा, (००) (००) (०१) समग्र शिक्षा अभियान, (सर्वसाधारण) (राज्य हिस्सा ४० टक्के), ३१ सहायक अनुदाने (वेतनेतर) (२२०२ आय ६१२) या लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा.
३.
सदर निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडे सुपूर्त
करण्यात येत आहे. सदर निधी आहरीत करुन वितरीत करण्यासाठी अवर सचिव/ कक्ष अधिकारी (रोख शाखा/ लेखा शाखा), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “आहरण व संवितरण अधिकारी” तर सह सचिव / उप सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरीत करुन समग्र शिक्षा यांच्या बँक खात्यात जमा करावा.
४. वित्त विभाग, शासन निर्णय/परिपत्रक दि.२५.०७.२०२४ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे. सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरीताच्या अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत.
५. सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र.२७२/१४७१, दि.२७.०६.२०२४ व वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. ७९३/व्यय-५, दि.०२.०९.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९२५१७३१०६१८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.