जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवणार शैक्षणिक व्यासपीठ : महामोर्चा काढणार samuhik leave andolan
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : संचमान्यतेचा निर्णय
आदेश ताबडतोब रद्द करा व ५ सप्टेंबर २०२४ चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने येत्या बुधवारी (दि. २५) कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या सभेत घेण्यात आला.ही सभा मुख्याध्यापक संघाच्या
विद्याभवन सभागृहात शनिवारी झाली. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार भगवान साळुंखे, शिक्षक नेते दादा लाड यांच्या उपस्थितीत एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी २५ सप्टेंबरला सकाळी साडे अकरा वाजता टाऊन हॉल येथे एकत्रित यावे, असे आवाहन करण्यात आले.
या सभेस सचिव आर. वाय. पाटील, खंडेराव जगदाळे, सुधाकर निर्मळे, बाबा पाटील, राजाराम वरुटे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, उदय पाटील, के. के. पाटील, राजेश वरक, इरफान अन्सारी, आदी उपस्थित होते.