अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंची गट-क पदावर थेट नियुक्तीसाठी शिफारस sports player in government service 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंची गट-क पदावर थेट नियुक्तीसाठी शिफारस sports player in government service 

आदेश :-अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंच्या थेट नियुक्त्तीचे सुधारीत धोरण संदर्भाधीन क्र.१ येथील दि.०९/०७/२०२४ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे. तसेच खेळाडूंच्या थेट नियुक्तीसाठी संदर्भाधीन क्र.३ येथील दि.३०/०८/२०२४ च्या शासन निर्णयान्वये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवर पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंच्या थेट नियुक्तीसाठीच्या प्रलंबित अर्जाच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गट क पदावर थेट नियुक्तीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरविलेल्या २० खेळाडूंची शिफारस यादी सोबतच्या विवरणपत्र-अ मध्ये जोडली आहे. सदर २० खेळाडूंची त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या सहायक क्रीडा विकास अधिकारी (प्रशिक्षण) (गट-क), वेतनश्रेणी एस-१० २९२०० ९२३०० या पदावर पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून अस्थायी स्वरूपात थेट नियुक्ती प्रस्तावित करण्यात येत आहे :-

(०१) सदर विवरणपत्रात नमूद २० खेळाडूंनी दिनांक ११ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयात व्यक्तिशः उपस्थित राहून अस्थायी नियुक्तीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. सदरहू कालावधीत उमेदवारांनी अस्थायी नियुक्ती स्विकारली नाही तर त्यांची थेट नियुक्तीसाठी केलेली शिफारस रद्द करण्यात येईल.[/read]

(०२) नियुक्ती स्विकारण्यासाठी उपस्थित रहाताना, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, क्रीडा

अर्हता व अन्य अटींसंदर्भातील खाली नमूद केलेली मूळ प्रमाणपत्रे व सदर प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक राहील :-

(1) वयोमर्यादा: (अर्ज केल्याच्या दिनांकास कमाल ४३ वर्षे) जन्म तारखेसंबंधीचे कागदपत्र.

(i) अधिवास: महाराष्ट्र राज्याचा रहिवास प्रमाणपत्र.

(ii) शैक्षणिक अर्हता उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण केल्याचे कागदपत्र.

(v) थेट नियुक्तीच्या अर्जात नमूद केल्याप्रमाणे क्रीडा अर्हतेसंबंधीची प्रमाणपत्रे

(v) दिव्यांग खेळाडूंबाबत दिव्यांग प्रमाणपत्र (पॅरा स्पर्धेतील तरतुदीनुसार)

(०३) खेळाडूंच्या वर नमूद क्र. (२) येथील कागदपत्रांची तसेच अन्य आवश्यक पात्रताविषयक मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांचे स्तरावरुन करण्यात यावी. सदर मूळ प्रमाणपत्रे शासन निर्णयात/अधिसूचनेत नमूद केलेल्या अर्हतेनुसार आहेत किंवा कसे याची तपासणी करण्यात यावी. थेट नियुक्तीकरिता केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने, तपासणीसाठी आवश्यक व योग्य ती प्रमाणपत्रे खेळाडूने सादर केली नसल्यास, खेळाडूचे पुढील नियुक्ती आदेश निर्गमित करता येणार नाहीत व खेळाडूची थेट नियुक्तीसाठीची शिफारस रद्द करण्यात येईल.

(०४) थेट नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या खेळाडूने खालीलपैकी एक प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे:-

() सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९/०३/२००३ मधील तरतुदीनुसार (अ) D.O.E.A.C.C. सोसायटीच्या अधिकृत C.C.C. किंवा ० स्तर किंवा किंवा स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

किंवा

(i) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र

किंवा

(ii) माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभागाच्या शासन निर्णय क्रमांक मातंस- २०१२/प्र.क्र.२७७/३९, दिनांक ०४/०२/२०१३ व शासन पूरकपत्र क्र. मार्तसं- २०१२/प्र.क्र.२७०/३९, दिनांक ०८/०१/२०१८ मध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक संगणक अर्हता.

खेळाडूकडे सदर प्रमाणपत्र/अर्हता नसल्यास, नियुक्ती स्विकारल्यापासून दोन वर्षाच्या आत खेळाडूने उपरोक्त शासन निर्णयातील नमूद संस्थेचे संगणक ज्ञानाच्या अर्हतेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

विहित कालावधीत खेळाडूने सदर प्रमाणपत्र सादर न केल्यास शासन अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०१७/प्र.क्र.४६२/कार्या.१२, दि.२८/५/२०१८ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

(०५) हिंदी व मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार खेळाडू अगोदरच सदर परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यास त्यासंबंधीची प्रमाणपत्रे/कागदपत्रे सादर करण्यात यावीत. खेळाडू अगोदरच सदर परीक्षा खेळाडू उत्तीर्ण झाला नसेल किंवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर, खेळाडूंना विहित कालावधीत हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

(०६) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.चारित्र्य-२११७/प्र.क्र.४८३/२०१७/१६-अ, दिनांक २८/०८/२०१७ सोबत जोडलेला साक्षांकन नमूना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून खेळाडूंनी तो तेथून डाऊनलोड करावा. सदर साक्षांकन नमुना पूर्णपणे भरुन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयात नियुक्ती आदेश स्वीकारताना सादर करावा.

(०७) खेळाडूने नियुक्ती स्वीकारताना खालीलपैकी कोणता विकल्प स्वीकारणार आहे, हे लेखी स्वरूपात सादर करणे आवश्यक राहील:-

(अ) खेळाडूस क्रीडा विभागातील पदावर नियुक्ती झाल्यापासून क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सराव / प्रशिक्षणासाठी, कर्तव्यावर हजर न राहण्याची सवलत हवी आहे

अथवा

(ब) खेळाडू कर्तव्यावर लगेच हजर होणार आहे.

या संदर्भात संदर्भ क्र.१ येथील दिनांक ०९/०७/२०२४ रोजीच्या शासन निर्णयामधील अ.क्र.१३ येथील तरतुदी/आदेश विचारात घेण्यात यावेत.

(०८) खेळाडूंना शासनमान्य अधिकृत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्पर्धा सोडून इतर व्यावसायिक स्पर्धांमध्ये कोणत्याही स्वरुपात सहभाग घेता येणार नाही. अशा स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतल्यास त्यांना देण्यात आलेली थेट नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.

(०९) खेळाडूंची वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी (पोलीस तपासणी अहवाल) त्यांच्या नियुक्तीनंतर करण्यात येणार आहे. सदर बाबी पूर्ण होण्याच्या अधीन राहून खेळाडूस अस्थायी नियुक्ती देण्यात येणार आहे, याची पूर्वकल्पना खेळाडूंस देण्यात यावी.

(१०) खेळाडूंना थेट नियुक्तीनंतर, संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, नेताजी सुभाषचंद्र राष्ट्रीय क्रीडा संस्था, पतियाळा संस्थेचा किंवा सदर संस्थेच्या कोलकाता, बेंगळूरू किंवा गांधीनगर येथील विभागीय केंद्राचा किंवा यासंदर्भातील मान्यताप्राप्त संस्थेचा क्रीडा प्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी संलग्न असलेल्या किंवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिलेल्या, संबंधित खेळाच्या आंतरराष्ट्रीय महासंघाद्वारे आयोजित केले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील..

थेट नियुक्तीने नियुक्त होणारा खेळाडू अशी अर्हता धारण करीत नसेल अशा परिस्थितीत थेट नियुक्तीने नियुक्त होणाऱ्या अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना त्यांच्या अस्थायी नियुक्तीपासून (खेळाचा सराव/प्रशिक्षण यासाठी सवलत घेतली असल्यास तो कालावधी वगळून) पुढील ५ वर्षांच्या कालावधीत, सदर पदविका अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणे आवश्यक राहील. सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता खेळाडूंना सदर अभ्यासक्रम कालावधीसाठी विशेष रजा मंजूर करण्यात येईल. अशी रजा सेवा कालावधीत एकदाच अनुज्ञेय राहील.

थेट नियुक्ती दिलेल्या अत्त्युच्य गुणवत्ताधारक खेळाडूंनी उक्तप्रमाणे नियमित नियुक्तीपासून ५ वर्षाच्या कालावधीत वरील अर्हता वारण करणे आवश्यक आहे अन्यथा सदर अर्हता धारण करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

(११) अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू क्रीडा स्पर्धेत उत्तेजक द्रव्य चाचणी (Doping) मध्ये दोषी ठरल्यास आणि सदर उत्तेजक चाचणीबाबत अंतिम आदेश देणाऱ्या संस्थेनेदेखील (उदा. जागतिक डोपिंग रोधी यंत्रणा WADA, राष्ट्रीय डोपिंग रोधी यंत्रणा NADA) सदर आदेश कायम केल्यास, अशा खेळाडूस देण्यात आलेली थेट नियुक्ती तात्काळ संपुष्टात आणण्यात येईल. तथापि, थेट नियुक्त खेळाडूने समुचित प्राधिकरणाकडे अपिल दाखल कैले असल्यास त्याच्याविरुध्द उत्तेजक द्रव्य चाचणी (Doping) प्रकरणाबाबत चौकशी चालू असेल तोपर्यंत त्याला/तिला, खेळाचा सराव/प्रशिक्षणाकरिता खेळाडू म्हणून देण्यात येणारी सवलत अनुज्ञेय राहणार नाही.

(१२) खेळाडूंना नियुक्तीनंतर शासनाकडून वेळोवेळी विहीत करण्यात येणारी कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडणे बंधनकारक राहील.

(१३) सदर खेळाडूंना नियुक्तीनंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतुदी तसेच शासनाकडून

येळोवेळी विहीत करण्यात येणारे नियम/शासन निर्णयातील तरतुदी लागू राहतील.

(१४) उक्त नमूद अटींची पूर्तता न झाल्यास खेळाडूंच्या सेवा समाप्त करण्यात येतील.[read more]

शासन निर्णय pdf download