राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देणेबाबत free gas cylinder yojana
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देणेबाबत
प्रस्तावना:-राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी
बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत
उपलब्ध करून देण्याचा निर्णय वाचा क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदर
योजना “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” या नावाने राबविण्यात येत आहे. या शासन निर्णयान्वये
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची कार्यपध्दती विहित केली आहे. सदरील योजनेची अंमलबजावणी
सुलभरीतीने व्हावी यासाठी दि.०१.०८.२०२४ रोजी प्रधान सचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक
संरक्षण विभाग यांचे अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या तेल कंपन्यांचे वरीष्ठ अधिकारी तसेच अन्य
संबंधीतांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेल कंपन्यांच्या यंत्रणेव्दारे लाभार्थ्यांचा
लाभ (DBT) त्यांच्या बँक खात्यात जमा करणे तांत्रिकदृष्ट्या सोईचे असल्याने सदर पर्यायाबाबत
कंपन्यांनी त्यांचे मत द्यावे, अशा सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने राज्यस्तरीय समन्वयक,
तेल उद्योग, महाराष्ट्र राज्य यांनी दि.०९.०८.२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्रधानमंत्री उज्ज्वला
योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही तेल
कंपन्यांच्या यंत्रणेव्दारे लाभार्थ्यांचा लाभ (DBT) त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास हरकत
नसल्याचे शासनास कळविले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण योजना या दोन्ही लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरच्या सबसिडीची रक्कम तेल कंपन्यांच्या एकाच
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः घगैस-२०२४/प्र.क्र.५८/नापु-२७
यंत्रणेव्दारे हस्तांतरित करणे तांत्रिकदृष्ट्या तसेच प्रशासकीयदृष्ट्या सुलभ होईल. सबब, त्यानुषंगाने मुळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन शुध्दीपत्रक:-
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसंदर्भातील समक्रमांक दि.३०.०७.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दे खालीलप्रमाणे वाचण्यात यावेतः-