यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये PM SHRI योजनेतून मंजूर झालेल्या शाळेच्या नावासमोर “PM SHRI” prefix करणेबाबत

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये PM SHRI योजनेतून मंजूर झालेल्या शाळेच्या नावासमोर “PM SHRI” prefix करणेबाबत

संदर्भ : केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No. १-१४/२०२२-१९-१९ दि. ३० ऑगस्ट, २०२४.

सन २०२३-२४ या वर्षापासून केंद्र शासनाकडून PM SHRI योजना कार्यान्वित केली आहे. सदर योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रथम टप्प्यात ५१६ व दुसऱ्या टप्प्यामध्ये ३११ अशा प्रकारे एकूण ८२७ शाळांची निवड करण्यात आली आहे. PM SHRI योजना राज्य व केंद्र शासन यांच्या मदतीने राबविण्याकरिता MoU झालेला आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या दि. ३०/०८/२०२४ रोजीच्या पत्रानुसार PM SHRI योजने अंतर्गत मंजूर झालेल्या शाळेच्या नावासमोर PM SHRI हे नाव जोडण्यात यावे व त्याप्रमाणे यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेचे नाव बदल करून घेण्याकरिता कळविण्यात आले आहे.

PM SHRI जोडलेल्या शाळेचे नाव यु-डायस प्लस प्रणालीमध्ये, प्रमाणपत्र व मार्कसिटवर ठळक अक्षरावर दिसण्याबाबत कळविले आहे. तरी याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळेचे नाव अद्ययावत करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही करण्यासाठी आपल्या स्तरावरून

आदेशित करावे व कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठविण्यात यावा. सोबत

सुलभ माहितीसाठी PM SHRI योजने अंतर्गत मंजूर झालेल्या शाळांची यादी व भारत

सरकारकडील पत्र.