पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (FLN) निपुण महाराष्ट्र कार्यक्रम fundamental literacy and numeracy programme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (FLN) निपुण महाराष्ट्र कार्यक्रम fundamental literacy and numeracy programme 

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (FLN) निपुण महाराष्ट्र कार्यक्रम सर्वसमावेशक व प्रभावी अंमलबजावणीसाठी माता गटांना सहभागी करुन घेणेबाबत.

प्रस्तावना:-

विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत. त्यांच्या सर्वागिण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारत सरकारच्या ‘निपुण भारत’ प्रकल्पांतर्गत राज्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. ‘स्टार्स प्रकल्प’ अंतर्गत इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी ‘पहिले पाऊल-शाळापूर्व तयारी अभियान’ देखील राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात अथवा गावात मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी एप्रिल २०२२ आणि जून २०२२ मध्ये मेळावे आयोजित करण्यात आले होते. या दोन मेळाव्यां दरम्यान वाडी-वस्तीवर माता-पालकांचे गट तयार करून त्यांना साहित्य पुरविले आणि मार्गदर्शन केले गेले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्राप्त आकडेवारी नुसार राज्यत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ६७,००० हुन अधिक प्राथमिक शाळांमध्ये शाळापूर्व तयारीचे मेळावे आयोजित करण्यात आले. ज्यात १४ लक्ष पेक्षा जास्त मुलं सहभागी झाली आणि त्यांच्या मातांचे जवळ जवळ २.५ लक्ष गट स्थापन झाले.

नुकतेच “प्रथम” संस्थेद्वारे करण्यात आलेल्या नमुना मूल्यांकनाद्वारे आणि पालकांकडून प्राप्त प्रतिक्रियांद्वारे ह्या मेळाव्यांचा आणि माता गटांचा सकारात्मक परिणाम मुलांच्या शाळापूर्व तयारी मध्ये झालेला दिसुन आला आहे.

पहिल्या मेळाव्या दरम्यान इयत्ता पहिलीत प्रवेशपात्र मुलांपैकी ५१% मुलांना बौद्धिक कौशल्याच्या विविध कृती करता येत होत्या (उदा. वस्तू किंवा चित्रातील लहान-मोठा फरक

भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत “मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान ची अंमलबजावणी करणेबाबत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, असे ठळकपणे नमूद आहे. वय वर्षे ३ ते ९ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरीत एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वंकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारने “समग्र शिक्षा” मध्ये निपुण भारत (National Initiative For

Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता ३ री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य (ऑफलाईन व ऑनलाईन), निश्चित क्षमता विधाने (Learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. सध्या इयत्ता ४ थी व ५ वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मुलभूत कौशल्ये प्राप्त केली नाहीत, त्यानांही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन

साहित्य (छापील व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

👉👉निपुण महाराष्ट्र कार्यक्रम पीडीएफ येथे पहा click here

Leave a Comment