“लखपती दीदी”ला नेमके किती रुपये मिळतात? या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपये मिळणार lakhpati didi yojna
मुंबई : राज्यात लाडकी बहीण योजनेला लोकप्रियता मिळाल्याने ही योजना चर्चेत असताना महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली ‘लखपती दीदी’ योजनाही चर्चेत आली आहे. महिलांना पाच लाख रुपयांची मदत देणारी, महिला सक्षमीकरणाला चालना देणारी ही योजना आहे तरी काय?
उद्देश काय?
महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती व्हावी, उद्योग क्षेत्रात सहभाग वाढावा, महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाव्या.
किती मिळते मदत? ही योजना बचत गटाला जोडलेल्या
महिलांना मदत करण्यासाठी आहे. योजनेद्वारे महिलांना कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
लाभासाठी अट काय?
अर्जदार महिलेच्या घरातील कोणीही व्यक्ती शासकीय नोकरदार नसावा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला पात्र आहेत.
महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेला मिळालेल्या विषयानंतर केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपये मिळणार आहेत अतिशय चांगली योजना महिलांना सक्षम बनवण्यासाठी स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना बनवण्यात आलेली आहे.
या योजनेचा मुख्य हेतू हाच आहे की महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे तसेच महिलांना सक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे असे केंद्र सरकारने जाहीर केलेले आहे या योजनेअंतर्गत महिलांना पाच लाख रुपये मिळतात यातून व्यवसायासाठी रक्कम गुंतवली जाते तसेच महिलांना सहाय्य केले जाते.