शिक्षक दिन सुंदर मराठी भाषण 2024 marathi speech on teachers day
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करत आहोत शिक्षक दिन खऱ्या अर्थाने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन होय डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते परंतु त्यापूर्वी ते एक शिक्षक होते त्यामुळे शिक्षकांच सन्मान करण्यासाठी व गौरव करण्यासाठी डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर रोजी असतो पाच सप्टेंबर हा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त मराठी सुंदर भाषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे भाषण करावे लागते त्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत.
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला शिक्षक दिनाविषयी काही शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्रतेची विनंती.
👉👉हेही वाचा शिक्षक दिन जबरदस्त मराठी भाषण
शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांचा गौरव दिन होय शिक्षकांचा सन्मानाचा दिन होय शिक्षकांचा आदराचा खऱ्या अर्थाने आजच्या दिवशीच नाहीतर पूर्ण आयुष्यभर देखील गुरूचा महिमा आपण कधीही विसरणार नाही आणि शिक्षकासाठी कोणताही दिवस नसतो तर प्रत्येक दिवस हा शिक्षकांमुळे असतो खऱ्या अर्थाने शिक्षकाचे काम गौरवस्पद आहे आपल्या भारताचा आधारस्तंभ म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यार्थी आहे परंतु या विद्यार्थ्यांना योग्य बनवण्याचे कार्य शिक्षकांच्या हातामध्ये आहे त्यामुळे शिक्षक देखील विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुणांना वाव देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात त्यामुळे गुरूचा महिमा हा आघाद आहे.
पूर्वीपासूनच शिक्षण पद्धती अस्तित्वात होती तसेच पूर्वी देखील गुरूचे स्थान सर्वोच्च होते आज देखील गुरुचे स्थान सर्वोच्च आहे आई-वडिलांनंतर सर्वात प्रथम जर कोणी असेल तर ते आपले शिक्षक आहेत प्रत्येक शिक्षकाला असे वाटते की आपला विद्यार्थी आपला पाल्य हा मोठा झाला पाहिजे तो योग्य वळणावर गेला पाहिजे तसेच त्याने स्वतःचे नाव मोठे केले पाहिजे हे फक्त आई-वडील आणि शिक्षकांनाच वाटत असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांचे व आई-वडिलांचे नेहमी ऐकणे गरजेचे आहे.
आपल्या शाळेमध्ये 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो प्रत्येक कार्यालयामध्ये शाळेमध्ये हा दिन साजरा केला जातो तसेच या दिवशी प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा आदर सन्मान करतात शिक्षकांना गुरूंना शुभेच्छा देखील देतात काही भेटवस्तू देखील देतात.
दरवर्षी आपण 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबर हा दिवस खऱ्या अर्थाने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे एक महान शिक्षक होते विद्वान विचारवंत देखील होते पुढच्या काळामध्ये ते आपल्या देशाचे प्रथम उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती झाले होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या जीवनामध्ये वीर सावरकर आणि स्वामी विवेकानंद यांना गुरु मानले होते आदर्श मानले होते त्यांनी युवकानंद व सावरकर यांच्या जीवनावरील जीवन चरित्रांचा अभ्यास केला होता आपले वाचन लेखन भाषण या माध्यमातून राधाकृष्णन सर्वपल्ली यांनी संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली होती राज राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते अष्टपैलू होते तसेच भारतीय संस्कृतीचे देखील त्यांना ज्ञान होते भारतीय संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
संपूर्ण भारतामध्ये आजचा दिवस हा विद्यार्थी आपल्या गुरूंचा सन्मान करण्यासाठी साजरा करतात विद्यार्थी आजच्या दिवशी शिक्षकांचे हार तुरे देऊन सन्मान करतात तसेच शिक्षक म्हणजे समाजाचा पाठीचा कणा होय विद्यार्थ्यांचे चरित्र निर्माण करून त्याला देशाची एक आधारस्तंभ बनवण्याचे काम आदर्श बनवण्याचे काम हे शिक्षक करतात सर्व व्यवसायांमध्ये शिक्षकांचा व्यवसाय हा एक जबाबदारीचा व्यवसाय आहे कारण यामध्ये खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडवण्याचे कार्य त्यांच्या हातामध्ये असते आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थी म्हणजे मातीचा गोळा होय आणि या मातीच्या गोळ्याला योग्य आकार देण्याचे काम शिक्षकांना करावे लागते कारण विद्यार्थी हे प्रत्येक गोष्टीपासून अनभिज्ञ असतात विद्यार्थ्यांना योग्य वळण लावणे हे शिक्षकाच्या हातात असते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे तसेच विद्यार्थ्यांमधील कौशल्य त्यांना नवीन गोष्टी शिकवणे तंत्रज्ञान शिकवणे हे कार्य शिक्षकांचेच आहे आणि ते चांगल्या प्रकारे करत असतात त्यामुळे विद्यार्थी देखील चांगल्या प्रकारे घडत असतात.
एक शिक्षक हजारो पिढ्या घडवत असतो आणि या घडवलेल्या पिढ्या हे भारताचे आधारस्तंभ आहेत एक सुजाण नागरिक बनवण्याचे काम शिक्षक करत असतात शिक्षकाचा महिमा खूप मोठा आहे शिक्षकांना अतिउच्च स्थान दिलेले आहे आपल्या संस्कृतीमध्ये शिक्षकांना आई-वडिलांपेक्षाही उच्च स्थान दिले जाते कारण प्रत्येक शिक्षकाला ज्याप्रमाणे आई-वडिलांना असे वाटते की आपला मुलगा मोठा झाला पाहिजे आपल्या मुलाला मोठी नोकरी लागली पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षकांना देखील तीच भावना असते की आपला विद्यार्थी हा मोठा झाला पाहिजे आपला विद्यार्थी हा आपल्यापेक्षाही मोठा झाला पाहिजे ही भावना फक्त शिक्षकांमध्ये असते त्यामुळे शिक्षकांच्या कार्याकडे दुर्लक्ष न करता आपण नेहमी शिक्षकांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे व शिक्षकांना नेहमी प्रेम दिले पाहिजे