NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्याबाबत 7th pay commission installment
संदर्भ:- १) शासन निर्णय क्रमांक वेतन-१२१९/प्र.क्र.१०५/टिएनटी-३, दिनांक १०.०१.२०२०
२) मा.माजी वि.प.स. श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक १९.०२.२०२४ रोजीचे पत्र
उपरोक्त विषयावरील मा. माजी वि.प.स. श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक १९.०२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये NPS, DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्याबाबत विनंती केली आहे.
२. सन २००५ पूर्वी विनाअनुदान / अंशतः अनुदान तत्वावर कार्यरत असलेले परंतु सन २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) लागू असून यापैकी काही शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणींमुळे राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे ((NPS) खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खाते / परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय दिनांक १०.०१.२०२० मधील तरतुदीनुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही. तथापि, ज्या शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांनी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे (NPS) खाते उघडले नाहीत व ते सेवानिवृत्त झालेले आहेत फक्त अशा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते रोखीने देण्यात यावे.