जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदली करीता प्रहार शिक्षक संघटनेला साकडे prahar shikshak sanghatna
मागील दहा वर्षांपासून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या झालेल्या नाहीत बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या व गैरसोयीच्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांना बदलीची संधी नसल्यामुळे बदलीपासून वंचित आहेत माध्यमिक शिक्षकांच्या रखडलेल्या प्रशासकीय बदल्या पुन्हा सुरू व्हाव्यात.हा अन्याय दूर करण्यासाठी मा.आ.बच्चूभाऊ कडू आणि मा.महेशजी ठाकरे ,राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अमोल आगे विभागीय सचिव, अमरावती जिल्हा तज्ञ सल्लागार राजेंद्र राऊत , प्रमोद करणकार, गोपाल भोरखडे प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.चर्चेदरम्यान मा.ठाकरे सरांनी बदल्या संदर्भात धोरणात्मक बदल होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. निवेदनावर मुन्तजीर शहा, विष्णू मिसाळ, तौसीफ अहमद खान,डॉ.मो.जाकिर नोमानी यासह बहुसंख्य माध्यमिक शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सदर मागणी संदर्भात लवकरच महेश ठाकरे सरांच्या नेतृत्वात राज्यातील शेकडो माध्यमिक शिक्षक मंत्रालय स्तरावर धडक देणार आहेत.
जय प्रहार !
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺