श्रावणी सोमवार निमित्त शाळांना दुपारच्या सत्रात सुट्टी घोषित करणे बाबत shravani Monday afternoon holidays
संदर्भ :- शासन निर्णय क्र. संकीर्ण 2015/प्र.क्र.206/एसडी-2/मंत्रालय मुंबई दि.08 सप्टेंबर 2015
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार आपणांस सुचित करण्यात येते की, श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हयात श्रावण सोमवारी शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात ठेवावे अशी विनंती शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे. या संदर्भात पुर्वोदहारण देवू नये अशा निर्देशासह खालील प्रमाणे सुचना निर्गमित कराव्यात.
RTE Act 2009 नुसार दररोज 5 तासांचे अध्यापन अनिवार्य असल्याने शाळेचे दैनंदिन शैक्षणिक कामकाजावर परिणाम होणार नाही व शाळेतील रोजच्या तासीका घेण्यात येतील या अर्टीवर श्रावण सोमवारी जिल्हयातील सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी 9.30 ते दुपारी 4.00 या वेळेऐवजी सकाळी 7.00 ते 12.00 वा या वेळेत भरविण्याची मुख्याध्यापकांना मुभा देण्यात येत आहे. मा.मु.का.अ. यांच्या मान्यतेनुसार,