सन २०२३ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत teacher inter district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२३ मध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत teacher inter district transfer 

संदर्भः- १. महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग मंत्रालय, शासन निर्णय क्रमांक / आजिब २०२३/प्र.क्र.११७/आस्था १४, दिनांक २३/५/२०२३

२. सहायक आयुक्त मा.व.क. यांचे जा.क्र./आस्था/बीसीसी/६३३/२०२३ दि. १५/०९/२०२३

३. या कार्यालयाचे पत्र जा.क्र. /जिपअ/शिक्षण/आस्था/डी-२/३५९६/२०२४ दि. ०९/०५/२०२४

४. या कार्यालयाचे पत्र जा.क्र, जिपअ/शिक्षण/आस्था/डी-२/३५३६/२०२४ दि. १६/०५/२०२४

५. शासन स्तरावर मार्गदर्शनाचे पत्र जा.क्र./जिपअ/शिक्षण/आस्था/डी-२/५८३९/२०२४

दि. ०३/०७/२०२४

महोदय,

उपरोक्त संदर्भ ४ अन्वये शिक्षण विभाग (प्राथ.) जि.प. अमरावती मधीलसहायक शिक्षक संवर्गाची सन २०२३ ची मराठी माध्यमाची बिंदुनामावली सहायक आयुक्त (मा.व.क.) विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांचे कडुन मान्य झाली असुन मराठी माध्यम बिंदुनामावली नुसार सर्व प्रवर्गातील शिक्षक संवर्गाची पदे अतिरिक्त ठरत असल्याने जिल्हा परिषद अमरावती येथे सन २०२३-२०२४ मध्ये आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना सामावुन घेता येणार नाही याबाबत कळविण्यात आले होते

संदर्भ ५ अन्वये मराठी माध्यमाची सर्व प्रवर्गाची पदे अतिरिक्त असल्यामुळे आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद अमरावती येथे येणा-या शिक्षकांना समावुन घेता येईल किंवा कसे? याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

तथापी सन २०२३-२०२४ च्या आंतरजिल्हा बदल्या संगणक प्रणालीद्वारे शासन स्तरावरुन राबविण्यात आल्या असून जिल्हा परिषद अमरावती येथुन आंतर बदलीने जाणा-या २७ सहायक शिक्षकांच्या जागेवर साखळी पध्दतीने इतर जिल्ह्यातुन १४ शिक्षकांची बदल्या झाल्या असल्याने जि. प. अमरावती येथे रुजु झालेल्या ०५ शिक्षकांना सामावून घेण्यात आलेले आहे.

करीता सन २०२३-२४ वर्षात आपल्या जिल्हा परिषद मधुन जि. प. अमरावतीमध्ये आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना अमरावती जिल्हा परिषदेमध्ये रुजु होण्याकरीता आपल्या स्तरावरुन कार्यमुक्त करण्यात यावे.

Leave a Comment