या कर्मचाऱ्यांचा 7 वा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता व ४ टक्के डीए ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बाबत pachva hafta and dearness allowance

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या कर्मचाऱ्यांचा 7 वा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता व ४ टक्के डीए ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बाबत pachva hafta and dearness allowance 

सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व देय असणाऱ्या कर्मचा-यांचा ४ टक्के डीए ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बाबत.

उपरोक्त विषयान्वये सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता (काही कारणास्तव राहिला असल्यास १,२,३ व चौथा हप्ता) ऑनलाईन पध्दतीने अदा करणेबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार सेवानिवृत्त शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा पाचवा हप्ता व देय असणारा ४ टक्के डीए ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी/अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये पेंडिग बिल या नावाने सुविधा देण्यात आली आहे. आपल्या शाळेतील कोणतेही सेवानिवृत्त कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या एकाही हप्त्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्राचार्य / मुअ यांनी घ्यावी.

२ मयत झालेल्या कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाचे सर्व हप्त्याचे देयक सादर करावेत. हार्ड कॉपी सादर

करतेवेळी सातव्या वेतन आयोगाचा फरक तक्ता (३६ महिन्याचा सोबत जोडावा.)

२ सेवानिवृत्त कर्मचा-यांची ४ टक्के महागाई भत्ता फरकाची देयकसुध्दा ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत.

३ यापूर्वी या कार्यालयास ऑफलाइन पध्दतीने सादर केली असल्यास सदरील देयक ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत.

४ Order No वे. मध्ये खालीलप्रमाणे माहिती भरावी.

१ Latur/Pension/1/ कर्मचा-यांचे नाव (प्रत्येक कर्मचा-यांसाठी स्वतंत्र अनुक्रमांक टाकावा)

२ Dateवी. मध्ये २९.०७.२०२४ हा दिनांक नमुद करावा.

सदरील देयक दि ०९.०८.२०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत हार्डकापी स्वाक्षरीस्तव दि १६.०८.२०२४ पर्यंत सादर करावी. विलंब व सदरील देयक दुबार होणार नाही याची दक्षता घ्यावी

Leave a Comment