सन २००६ पासुन नियुक्त शिक्षण सेवकांना जुनी पेंन्शन योजना लागू करणे बाबत old penshan scheme
संदर्भ :- १. वित्त विभाग, शा.नि.क्र. संकीर्ण २०२३/प्र.क्र.४६/सेवा. ४, दिनांक ०२/०२/२०२४ २. मा. आ. सत्यजीत तांबे, विधान परिषद सदस्य, यांचे दिनांक २४/०७/२०२४
उपरोक्त संदर्भिय विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते कि, संदर्भिय १ चे शासन निर्णयानुसार शिक्षण सेवक पदाच्या पदभरती सन जानेवारी २००६ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांची जाहिरात व नियुक्ती आदेशानुसार जुनी पेंन्शन योजना लागु होण्यास पात्र ठरत असलेले शिक्षण सेवक यांचे विकल्प दिनांक २/०८/२०२४ रोजी मुदत संपत असल्याने संबधित शिक्षण सेवकांचे विकल्प तात्काळ भरुन त्याची एक प्रत समक्ष या कार्यालयास सादर करण्यात यावी.