केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम शाळाबाहय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणाबरोबर असाक्षर व्यक्तींचेही सर्वेक्षण करणेबाबत navbharat saksharta karykram sarvekshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम शाळाबाहय विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणाबरोबर असाक्षर व्यक्तींचेही सर्वेक्षण करणेबाबत navbharat saksharta karykram sarvekshan 

(सन २०२२-२७) अंमलबजावणी करिता सन २०२४-२५ च्या देण्यात आलेल्या जिल्हानिहाय उद्दिष्टानुसार (असाक्षर व्यक्तींची संख्या) शाळाबाहय विद्याची सर्वेक्षणाबरोबर असाक्षर व्यक्तींचेही सर्वेक्षण करणेबाबत.

संदर्भ:- १. केंद्रशासनाद्वारे नभासाका अंमलबजावणीसाठी देण्यात आलेला Road Map

२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांकः नभासाका-०३२२/प्र.क्र.३९/एस.डी.२

दि.१४.१०.२०२२ व दि.२५.०१.२०२३

३. मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षेतेखाली दि.१८.०४.२०२३ रोजी संपन्न राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण-नियामक परिषद बैठकोचे मंजूर इतिवृत्त दि.११.०५.२०२३

४. या कार्यालयाचे पत्रजा.क्र. शिसंयो/नभासाका/मार्गदर्शक सूचना/२०२३-२४/१३२२ दि.०४/०७/२०२३

५. जा.क्र. शिसंयो/योजना-३/नभासा/२०२४-२५/१०३९ दिनांक. २५/०४/२०२४

६. जा.क्र. शिसंयो/योजना-३/नभासा/वानिआ/२०२४-२५/०११०० दिनांक ०२/०५/२०२४

७. प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं/शाबास-२०२४/७०१/४०६५ दि.११/०६/२०२४

उपरोक्त संदर्भ क्र. १ नुसार केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णय दि.१४.१०.२०२२ अन्वये राज्यामध्ये सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत उल्लास “नव भारत साक्षरता कार्यक्रम” या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय दि.२५.१.२०२३ अन्वये सदर योजनेच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, गट व शाळा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. संदर्भ क्र.३ अन्वये, मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षेतेखाली दि.१८.०४.२०२३ रोजी संपन्न झालेल्या राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण नियामक परिषदेच्या बैठकीमध्ये केंद्र/राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे नव भारत साक्षरता कार्यक्रम योजनेचे कामकाज पूर्ण करणेबाबत निर्देशित केलेले आहे.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्याकरीता ६ लक्ष २० हजार तसेच सन २०२३-२४ या वर्षाकरिता ६ लक्ष २० हजार

एवढे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. संदर्भ क्र. ५ नुसार दोन्ही वर्षातील एकूण १२ लक्ष ४० हजार एवढे उद्दिष्ट सन २०२४- २५ करिता कायम ठेवण्यात आलेले आहे. त्या उद्दिष्टापैकी अद्यापपर्यंत ६,७०,३७५ इतकी असाक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास अॅपवर झालेली असून ५,६९,६२५ इतकी असाक्षर व्यक्तींची नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने असाक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी दाखलपात्र विद्यार्थी शोध मोहिम तसेच शाळाबाहय विद्यार्थी सर्वेक्षणासोबत असाक्षरांचे व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र.६ नुसार या संचालनालयस्तरावरुन नव भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीसाठी देण्यात आलेल्या वार्षिक नियोजन आराखडयामध्ये सर्वेक्षणाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

संदर्भ क्र.७ नुसार प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी राज्यात दिनांक ०५/०७/२०२४ ते २०/०७/२०२४ पर्यंत शाळाबाहय विद्यार्थी सर्वेक्षण मोहिम राबविणेबाबत पत्र निर्गमित केलेले आहे. तरी या सर्वेक्षणासोबतच उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीसाठी असाक्षर व्यक्तीचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.

त्याअनुषंगाने आपण आपल्या जिल्हयातील शाळांना सोबत देण्यात आलेल्या प्रपत्रामध्ये असाक्षर व्यक्ती व स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करुन असाक्षर व्यक्तींची उल्लास अॅपवर नोंदणी व स्वयंसेवकासोबत टॅगिंग करण्याबाबत सूचना दयाव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

सोबत असाक्षर व्यक्ती सर्वेक्षण प्रपत्र १ ते ६

Leave a Comment