जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न universal yoga day
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काबळेश्वर व शारदानगर येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहामध्ये योग दिन साजरा केला .सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक हालचाली अंतर्गत पुरक हालचाली यामध्ये मानेचे व्यायाम, पायांच्या हालचाली, कंबरेच्या हालचाली घेण्यात आल्या . शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते उपशिक्षक श्री रेवणनाथ सर्जे उपशिक्षिका सौ सुनीता शिंदे सौ मनीषा चव्हाण या सर्वांच्या उपस्थितीत 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .
शारदाबाई पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वर्षा जाधव, साक्षी जाधव ,साक्षी सातपुते, सई पाटील, अपेक्षा रणवरे ,साक्षी करडे ,ऋतुजा परसुर या विद्यार्थिनी योगाचे धडे विद्यार्थ्यांना सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये दिले प्रामुख्याने धकाधकीच्या ,धावपळीच्या युगात शरीराला व्यायामाची आवश्यकता असून बालवयात योगा ,ध्यानधारणा, अनुलोम-विलोम ,बसरीका ,भ्ररी अशी प्राणायने घेण्यात आली .याबरोबरच ताडासन, वृक्षासन ,पदमहस्तासन, अर्धचक्रासन ,त्रिकोणासन, वक्रासन ,भुजंगासन पदमासन मयुरासान ,धनुरासन, अशा विविध आसनांची प्रात्यक्षिके मुलांच्याकडून करून घेण्यात आली . विद्यार्थ्यांच्या बरोबर शाळेतील सर्व शिक्षक यांनी योगासनांची प्रात्यक्षिके केली .
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या बालमनावर व्यायामाचे महत्त्व विविध पूरक हालचाली प्राणायाने विविध आसणे त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पटवून देण्यात आले .
