४१६ शिक्षकांच्या बदल्या, ३७० जणांचा बदलीस नकार जिल्हा परिषदेची प्रक्रिया : गर्दीने शासकीय विश्रामगृह परिसर फुलला teacher request transfer
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या पहिल्या दिवशी ४१६ शिक्षकांच्या सोयीच्या झालेल्या बदल्या त्यांनी स्वीकारल्या, तर ३७० जणांनी बदलीसाठी नकार दिला आहे. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये गुरुवारी सकाळी १० पासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. २२ जूनअखेरपर्यंत ही बदली प्रक्रिया सुरू राहणार आहे.
•
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी बदलीपात्र आणि मागणी आलेल्या ■शिक्षकांचे समुपदेशन केले. इच्छुकांना सभागृहात बोलावून त्यांना रिक्त जागांचा तक्ता दाखविण्यात येत होता. त्यातून बदलीसाठी सोयीचे गाव मिळत असेल तर शिक्षक बदली स्वीकारत होते, अन्यथा नकार देत होते. ज्यांनी बदली स्वीकारली आहे अशांना त्याच ठिकाणी बदली आदेश दिला जात होता.
सकाळी साडेनऊपासून बदलीची