CWSN सर्वेक्षण करणेबाबत disability sarvekshan

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CWSN सर्वेक्षण करणेबाबत disability sarvekshan

समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत अंगणवाडी, शाळा व महाविद्यालय प्रवेश. अनुकुलित साहित्य साधने, उपकरणे व अध्यापन शैक्षणिक साहित्य, सहाय्यभुत सेवा सुविधा दिव्यांग बालकांना वेळेत देण्यासाठी व नविन विद्यार्थी शोधण्यासाठी CWSN सर्वेक्षण करणेबाबत.

संदर्भ:- MPSP कडील जा.क्र मप्राशिप/समग्र शिक्षा/IE/२०२४-२५/१७१४ दि.११.६.२०२४ चे पत्र प्राप्त ईमेल१२.६.२०२४

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत विशेष शिक्षक व विशेषतज्ञ समावेशित शिक्षण यांच्या मार्फत वय वर्ष ० ते१८ वयोगटातील CWSN बालकांचे सर्वेक्षण दिनांक १५ ते ३० जून, २०२४ या कालावधीत करण्यात यावे. सर्वेक्षण हे प्रत्यक्ष अंगणवाडी शाळा ते शाळा या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात यावे. प्रती दिन एक गाव किंवा गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यास गरजे प्रमाणे वेळापत्रक तयार करुन सर्वेक्षण करण्यात यावे. सर्वेक्षण करतांना सर्व बाबींचा विचार करुन माहिती Google Sheet उपलब्ध करुन दिल्यानुसार ऑनलाईन भरण्यात यावी. तसेच लेखी स्वरुपात रजिस्टर वर नोंद घ्यावी. मुलाचे वय, वर्ग, पत्ता, फोन नंबर, दिव्यांग मुलांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उदा. बँकेचा तपशील, मदतनीस, परिवहन, लेखनिक, प्रोत्साहन भत्ता, साहित्य साधने इत्यादी या लिंकवर भरण्यात यावी. (लिंक Whats App ग्रुपवर पाठविण्यात येईल) ज्या बालकांना सहाय्यभूत सुविधा लागते त्या बालकांचे किंवा पालकांचे खाते विवरण व्यवस्थित घेण्यात यावे.

ऑनलाईन माहिती भरण्यास आपणांस उपरोक्त लिंक देण्यात येत आहे. त्या लिंकमध्ये माहिती व्यवस्थित न चुकता भरण्यात यावी. तसेच पत्र मिळताच सर्व विशेष शिक्षक व विशेष तज्ञ समावेशित शिक्षण यांच्यामार्फत होणान्या सर्वेक्षणाचे नियोजन करुन संभाव्य वेळापत्रक केंद्र निहाय या कार्यालयास मेल करण्यात यावे. त्यांच्यावर नियंत्रण व नियोजनानुसार भेटीची खातरजमा करण्यासाठी जिल्हास्तरावरून जिल्हा समन्वयक किमान १० ते २० टक्के शाळा स्तरावर भेटी देणार आहेत. तसेच सर्वेक्षण करताना एकही दिव्यांग मुल वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण १०० टक्के पूर्ण होईल व या मुलांची सन २०२४-२५ च्या UDISE मध्ये नोंद घेण्यात यावी. तसेच याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रस्तरावरील विशेष शिक्षक, समावेशित विशेष तज्ञ (समावेशित शिक्षण यांच्यावर निशित करण्यात यावी. सदर कामकाजास प्राधान्य देण्यात यावे. सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची राहील. याची नोंद घ्यावी,

Leave a Comment