सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत age of first standard
संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांक: RTE-2018/P.C.180/S.D.-1. दिनांक 18/09/20200 2. शासन निर्णय अनुक्रमांक: RTE-2019/P.Kr.119/S.D.-1 दिनांक 25/07/2019.
उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतू कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.
सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय