शिक्षक बदली नवीन प्रक्रिया मंगळवारपासून:२६ जुलै रोजी नियुक्ती झालेल्या शिक्षकांची होणार पदस्थापना teacher transfer
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा प्राथमिक शिक्षकांचे समायोजन, पदोन्नती, बदल्या व नियुक्त्यांच्या वेळापत्रकामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने बदल केला आहे. नव्या वेळापत्रकानुसार मंगळवारपासून (दि. ११) बदली प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना दि. २६ जून रोजी पदस्थापना देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीन शेंडकर यांनी दिली.
शिक्षक बदल्यांसाठी दि. २४ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अतिरिक्त शिक्षक समायोजन, मुख्या. पदोन्नती, जिल्हांतर्गत बदली, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना पदस्थापना देणे, पवित्र पोर्टलद्वारे नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना पदस्थापना
आला होता. परंतु, त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार मंगळवारी (दि. ११) जिल्हांतर्गत समायोजन प्रक्रिया व बदलीबाबत आलेल्या आक्षेपांवर सुनावणी होईल. बुधवारी (दि. १२) मुख्याध्यापक पदोन्नती, बदली व समुपदेशन घेण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. १३) जिल्हांतर्गत बदली पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून दि.१८ रोजी तालुकानिहाय रिक्त पदांचे समानीकरण जाहीर होणार आहे. दि. १९ जूनपासून पात्र शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या होणार आहे.
बोगस कागदपत्रे जोडल्याच्या तक्रारी?
बदलीसाठी जोडण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये काही जणांनी बोगस कागदपत्रे जोडली असल्याच्या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्याकडे आल्यामुळे शिक्षक बदलीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषेदत आहे.