फक्त या ‘जिल्हा परिषद’ मधील शिक्षकांच्या होणार ऑनलाईन बदल्या online teacher transfer
देशोन्नती वृत्तसंकलन अमरावती : गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या जिल्हापरिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आता ऑनलाईन प्रणालीने शासन स्तरावरून होणार आहे. याबाबतचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने नुकतेच जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. विशेष म्हणजे ही बदलीप्रक्रिया संपूर्ण राज्यात केवळ अमरावती जिल्ह्यातील ‘दुर्गम’ मधील शिक्षकांना ‘सुगम’ मध्ये बदलीकरिता राबविण्यात येणार आहे. प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून दुर्गममधील शिक्षकांना अखेर ‘अच्छे दिन’ आले.
दहा ते बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत अमरावती जिल्ह्यातील ‘दुर्गम’ (मेळघाट) मधील शिक्षकांना आता मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या सुगम
क्षेत्रातील बदलीचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. लोकसभेची आचारसंहिता संपताच मेळघाटमधील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासाठी शासन स्तरावरून केवळ अमरावती जि. प. करिता संगणकीय प्रणाली तयार करण्यात येत आहे. प्रहार शिक्षक संघटनेने दुर्गममधील शिक्षकांच्या बदलीबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या विभागीय बैठकीत शासन स्तरावर प्रस्ताव दाखल करण्याची मागणी आ. बच्चू कडू यांच्यामार्फत
केली होती. संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या मागणीही दखल घेऊन आ. बच्चू कडू यांनी दुर्गम मधील शिक्षकांना सुगम क्षेत्रात बदलीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना केल्या होत्या. याबाबत प्रस्ताव विभागीय व आयुक्तांकडून शासन स्तरावरून प्र पाठविण्यात आला होता. नंतर अ लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सदर प्रस्तावावर कार्यवाही होऊ शकली नाही; मात्र निवडणूक संपताच या प्रस्तावाची दखल घेत अखेर ग्रामविकास
विभागाचे कक्ष अधिकारी नितीन पवार यांनी दुर्गम मधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत तत्काळ कार्यवाहीचे आदेश जिल्हापरिषद प्रशासनाला दिले आहेत.
राज्यातील केवळ अमरावती जिल्हापरिषदेमधील दुर्गम शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत शासन स्तरावरून संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून विन्सीस या पुण्यातील कंपनीला याबाबतचा एक वर्षाचा कंत्राट देण्यात आला आहे, हे उल्लेखनीय. शिक्षकांची अद्ययावत माहिती झाल्यावर लवकरच सॉफ्टवेअर बदलीकरिता ‘रण’ होणार आहे. प्रहार शिक्षक संघटनेच्या प्रयत्नाने एकूणच दुर्गममधील शिक्षकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
दुर्गम मधील १०३५ शिक्षक एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे नोकरी करीत आहेत. त्यांना दर तीन वर्षांनी बदली मिळावी व त्यांच्या जागेवर कधीच दुर्गम मध्ये काम न केलेल्या शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, असे रोटेशन धोरण दुर्गम जिल्ह्यात राबवावे. जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही, असा मागणी प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यात आलेला होता. याची दखल शासनाने घेतल्याचे समाधान आहे. लवकरच सर्व दुर्गम जिल्ह्याकरिता प्रयत्न करू. – महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना