इयत्ता सातवी सर्व विषयांच्या अध्ययन निष्पत्ती उपलब्ध 7th standard all subject learning outcomes
इयत्ता सातवी विषय मराठी अध्ययन निष्पत्ती
07.01.01 विविध लेखनप्रकारांमध्ये लेखकाने मांडलेले विचार/आशय समजून घेतात, आशयाशी संबंधित स्वतःच्या अनुभवांवर आधारित साम्य, सहमती वा असहमती व्यक्त करतात.
07.01.02 कोणतेही चित्र/घटना, प्रसंग पाहून त्याचे स्वतःच्या पद्धतीने तोंडी किंवा लेखी स्वरूपात वर्णन करतात.
07.01.03 वाचलेल्या साहित्यावर चिंतन करून अधिक चांगल्या पद्धतीने आकलन होण्यासाठी प्रश्न विचारतात, चर्चा करतात.
07.01.04 परिसरातील लोककथा, लोकगीते आणि बोलीभाषा यांविषयी चर्चा करतात व त्यांचा आस्वाद घेतात.
07.01.05 विविध कला (उदा., हस्तकला, वास्तुकला, कृषिकला, नृत्यकला, चित्रकला) यासंबंधी जिज्ञासा व्यक्त करतात, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा आस्वाद घेतात.
07.01.06 वेगवेगळ्या स्थानिक, सामाजिक आणि भौगोलिक घटनांसंबंधी तर्कशुद्ध प्रतिक्रिया देतात. उदा., पावसाळ्यात सर्व परिसर हिरवागार होणे, याविषयी चर्चा करतात.
07.01.07 विविध संवेदनशील मुद्द्यांविषयी स्वतःचे तार्किक विचार तोंडी /लेखी स्वरूपात व्यक्त करतात.
07.01.08 विविध साहित्यांतील नवीन शब्द, म्हणी, सुविचार यांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा आस्वाद घेतात, वापर करतात, पाठ्यघटकाची वैशिष्ट्ये शोधतात.
07.01.09 कथा, कविता वाचून त्यांचे विविध प्रकार व शैली ओळखतात, त्यांचा आस्वाद घेतात. उदा., वर्णनात्मक, चरित्रात्मक.
07.01.10 कोणताही पाठ्यविषय समजून घेताना आवश्यकतेनुसार सहकारी मित्र व शिक्षक यांची संदर्भसाहित्यासाठी मदत घेतात. (उदा., शब्दकोश, इंटरनेट, इतर संदर्भ स्रोत इत्यादी.)
07.01.11 भाषेतील बारकावे/लेखन नियमव्यवस्था तसेच नवीन शब्दांचा प्रयोग करतात. उदा., एखाद्या कवितेत आलेले विशेष शब्द, कडवे यांमध्ये भर घालतात, त्याबाबत संकल्पना चित्र तयार करतात.
07.01.12 वेगवेगळ्या प्रसंगांत / संदर्भात सांगितले जाणारे इतरांचे विचार, गप्पा स्वतःच्या शैलीत लिहितात. उदा., आपल्या गावातील चावडीवरील गप्पा किंवा आपल्या परिसरातील वेगवेगळे कार्य करणाऱ्या लोकांविषयीच्या गप्पागोष्टी.
07.01.13 मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य (उदा., बातमीपत्र, बातम्या, कथा, माहितीपर साहित्य, इंटरनेटवर प्रसारित होणारे साहित्य इत्यादी.) समजपूर्वक वाचतात व त्याबाबत आपली आवडनिवड लिखित स्वरूपात स्वतःचे विचार व्यक्त करतात.
07.01.14
विविध विषय आणि उद्देशांसाठी लिहिताना उपयुक्त शब्द, शब्दसमूह, वाक्प्रचार, म्हणी, विरामचिन्हे व इतर व्याकरणीय घटकांचा उपयोग करतात, त्यांचा संग्रह करतात.
07.01.15
भित्तिपत्रिका लेखनासाठी विविध प्रकारचे साहित्य जमवतात व संपादन करतात.
07.01.16
घर व परिसरातील अनौपचारिक विषयांवरील संवाद ऐकतात, त्यात सहभागी होऊन आपले मत मांडतात.
07.01.17
विनोद, गाणी, कविता, कथा व संवाद ऐकून आनंद घेतात, या साहित्याच्या ध्वनिफिती समजपूर्वक ऐकून त्याचा आस्वाद घेतात.
07.01.18 पाठ्यविषय (गाणी, कविता, समूहगीते) योग्य अभिनयासह व योग्य आरोह-अवरोहासह म्हणतात, त्यांचे साभिनय सादरीकरण करतात.
07.01.19
घर, शाळा, समाज व परिसर यांमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांत सहभागी होतात.
07.01.20
योग्य आरोह-अवरोह व विरामचिन्हे यांची दखल घेऊन, अर्थपूर्ण प्रकट वाचन करतात व दिलेल्या वेळेत योग्य गतीने समजपूर्वक मूकवाचन करतात.
07.01.21
दिलेल्या उताऱ्याचे समजपूर्वक वाचन करून योग्य शीर्षक देतात.
07.01.22
विविध साहित्यप्रकारांचे साभिनय वाचन करतात.
07.01.23
लेखन नियमांनुसार वेळेत, योग्य गतीने अनुलेखन व श्रुतलेखन करतात.
07.01.24
विविध क्षेत्रांतील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करतात.
07.01.25
शब्दकोश संदर्भासाठी पाहतात, स्वतःचा शब्दकोश तयार करण्याचा प्रयत्न करतात.
07.01.26
परिसरातील सामाजिक समस्यांची माहिती घेतात, त्याबाबत आपले मत मांडतात.
07.01.27
व्याकरण घटकांची माहिती घेतात व त्यांचा लेखनात योग्य वापर करतात. उदा., सामान्यरूप, क्रियाविशेषण अव्यये, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये, केवलप्रयोगी अव्यये, वाक्य व वाक्यांचे प्रकार, शुद्धलेखनाचे नियम.
इयत्ता सातवी विषय हिंदी अध्ययन निष्पत्ती
विद्यार्थी –
07.15.01 विविध प्रकार की रचनाओं (गीत, कथा, एकांकी, रिपोर्ताज, निवेदन, निर्देश) आदि को आकलनसहित सुनते हैं, पढ़कर समूह में चर्चा करते हैं तथा सुनाते हैं।
07.15.02 सुने हुए वाक्य, उससे संबंधित अन्य वाक्य, रचना के परिप्रेक्ष्य में कहे गए विचार, वाक्यांशों का अनुमान लगाते हुए समझकर अपने अनुभवों के साथ संगति, सहमति या असहमति का अनुमान लगाकर अपने विचार अभिव्यक्त करते हैं।
07.15.03 किसी चित्र या दृश्य को देखने, अनुभवों की मौखिक / लिखित सूचनाओं को आलेख रूप में परिवर्तित करके अभिव्यक्त करते हैं तथा उसका सारांश लेखन करते हैं।
07.15.04 दिए गए आशय, पढ़ी गई सामग्री से संबंधित प्रश्न निर्मिति करते समय दिशा निर्देश करते हुए किसी संदर्भ को अपने शब्दों में पुनः प्रस्तुत करते हैं तथा उचित उत्तर लेखन करते हैं।
07.15.05 विभिन्न स्थानीय सामाजिक एवं प्राकृतिक मुद्दों/घटनाओं के प्रति चिकित्सक विचार करते हुए विषय पर चर्चा करते हैं।
07.15.06 लिखित संदर्भ में अस्पष्टता, संयोजन की कमी, विसंगति, असमानता तथा अन्य दोषों को पहचानकर वाचन करते हैं। उसमें किसी बिंदु को खोजकर अपनी संवेदना, अनुभूति, भावना आदि को उपयुक्त ढंग से संप्रेषित करते हैं।
07.15.07 जोड़ी/गुट में कृति/उपक्रम के रूप में संवाद, प्रहसन, चुटकुले, नाटक आदि को पढ़ते हैं तथा उसमें सहभागी होकर प्रभावपूर्ण प्रस्तुति करते हैं।
07.15.08 रूपरेखा एवं स्वयंस्फूर्त भाव से संवाद, पत्र, निबंध, वृत्तांत, घटना, विज्ञापन आदि का वाचन एवं लेखन करते हैं।
07.15.09 दैनिक कार्य नियोजन एवं व्यवहार में प्रयुक्त मुहावरों, कहावतों, नए शब्दों को सुनते हैं, मौखिक रूप से प्रयोग करते हैं तथा लिखित रूप से संग्रह करते हैं।
07.15.10 पाठ्यवस्तु को पढ़ने के दौरान समझते हुए स्वयं के लिए आवश्यक जानकारी, चित्र, वीडियो क्लिप, फिल्म आदि अंतरजाल पर खोजकर तथा औपचारिक अवसर पर संक्षिप्त भाषण तैयार करके लिखित वक्तव्य देते हैं।
07.15.11 दिए गए आशय का शाब्दिक और अंतर्निहित अर्थ श्रवण करते हुए शुद्ध उच्चारण, उचित बलाघात, तान अनुतान एवं गति सहित मुखर एवं मौन वाचन करते हैं।
07.15.12 प्रसार माध्यमों एवं अन्य कार्यक्रमों को सुनकर उनके महत्त्वपूर्ण तत्त्वों, विवरणों, प्रमुख मुद्दों आदि को पुनः याद कर दोहराते हैं तथा अपने संभाषण एवं लेखन में उनका प्रयोग करते हैं।
The learner-
Learning Outcomes
07.17.01
Listens attentively in the classroom.
07.17.02
Responds to different kinds of instructions, requests, and directions in varied contexts.
07.17.03
Understands announcements and speeches on familiar topics.
07.17.04
Finds specific details/facts/information in the form of a speech, dialogue or story.
07.17.05 Recalls specific facts/details/main points after listening to a programme.
07.17.06
Predicts the remaining part of a sentence, the next sentence, etc.
07.17.07
Thinks critically, compares and contrasts characters, events, ideas, themes and relates them to life.
07.17.08
Notes the difficult /unfamiliar bits while listening so as to ask questions later.
07.17.09
Carries out a complex /long process with the help of oral instructions.
07.17.10
Participates in different activities in English such as role play, poetry recitation, skit, drama, speech, quiz etc. organized by school and other such organisations.
07.17.11 Engages in conversations in English with family, friends, and people from different professions using appropriate vocabulary.
07.17.12
Uses appropriate body language, gestures and facial expressions while speaking.
07.17.13
Responds to questions and instructions appropriately and politely.
07.17.14
Co-operates with partners during practice sessions/drills.
07.17.15
Tries to report an incident in some detail.
07.17.16
Communicates one’s feelings/emotions appropriately in one or two lines.
07.17.17
Presents information with the help of posters or other visual aids.
07.17.18
Demonstrates a process/activity clearly.
07.17.19
Describes things, people, situations, emotions etc broadly.
07.17.20
Creates a dialogue/story/skit as a pair/group activity.
07.17.21
Reads familiar words/phrases at a glance. Reads different handwritings, scripts, fonts etc.
07.17.22
Reads/writes a book review.
07.17.23
Reads aloud meaningful chunks, stories and recites poems with appropriate pauses, intonations and pronunciations.
07.17.24
Understands the English text seen in the surroundings.
07.17.25
Follows simple, written instructions in a step by step manner.
07.17.26
Reads simple passages on familiar topics with comprehension.
07.17.27
Identifies details, characters, main idea and sequence of ideas and events in textual material.
07.17.28
Reads to seek information in print, notice board, sign boards in public places, newspaper, hoardings.
07.17.55
Understands the organisation of graphic presentations.
07.17.56
Compiles lists of useful words, expressions, idioms, definitions and formulas.
07.17.57
Classifies given information using different criteria.
07.17.58
Transfers verbal information to graphic format such as a chart, table, graph, flow charts web, map etc.
07.17.59
Writes appropriate captions to photographs, pictures and diagrams.
07.17.60
Makes notes for personal reference while listening/reading.
07.17.61
Frames appropriate questions to seek information, guidance.
07.17.62
Prepares questionnaires to interview people, to take a survey as a part of a project.
07.17.63
Provides English/ mother tongue equivalents for certain terms correctly while speaking/writing English.
07.17.64
Prepare/compile bilingual glossaries and other study tools.
07.17.65
Translates literary and non-literary pieces from mother tongue into English and English into mother tongue.
07.17.66
Enriches vocabulary through reading.
07.17.67
Finds required information, pictures, video clips, films etc on the computer/internet.
07.17.68
Handles various forms of digital material.
07.17.69
Understands the features available on a website and uses them properly, understands computer etiquettes (regarding passwords, email).
07.17.70
Identifies and uses verbs (main/auxiliary/transitive /intransitive/singular and plural forms).
07.17.71
Learns sentence structure, subject and predicate, subject, object (direct/indirect), subject and verb agreement (person, number).
07.17.72
Enriches vocabulary through word-building such as root words, prefix, and suffix.
07.17.73
Uses punctuation marks full stop, comma, question mark, exclamation mark, apostrophe, Capitalization.
अध्ययनार्थी
07.71.01 दोन पूर्णांकांचा गुणाकार / भागाकार करतात.
07.71.02 अपूर्णांकांच्या गुणाकार व भागाकाराचे अर्थनिर्वचन करतात. उदाहरणार्थ, 2/3×4/5 याचा अर्थ 4/5 चा 2/3 तसेच 1/2:1/4 याचा अर्थ किती वेळा 1/4 म्हणजे 1/2?
07.71.03 साध्या व दशांश अपूर्णांकांचा गुणाकार व भागाकार करण्यासाठी नियम वापरतात.
07.71.04 परिमेय संख्यांचा संबंध असणारे दैनंदिन जीवनातील प्रश्न सोडवतात.
07.71.05 मोठ्या संख्यांचे गुणाकार, भागाकार करण्यासाठी संख्यांच्या घातांकित रूपाचा उपयोग करतात.
07.71.06 दैनंदिन जीवनातील विविध परिस्थिती साध्या समीकरणांच्या रूपात मांडून समीकरणे सोडवतात.
07.71.07 बैजिक राशींची बेरीज, वजाबाकी करतात.
07.71.08 प्रमाणात असलेल्या आणि प्रमाणात नसलेल्या राशी (संख्या) ओळखतात. उदाहरणार्थ, 15/45 आणि 40/120 या संख्या समान आहेत म्हणून 15, 45, 40, 120 या संख्या प्रमाणात आहेत असे सांगतात.
07.71.09 शतमानाचे साध्या व दशांश अपूर्णांकांत रूपांतर करण्याचे प्रश्न तसेच उलट प्रकारचे प्रश्न सोडवतात.
07.71.10 गुणधर्मांच्या आधारे रेषीय जोडी, पूरक कोन जोडी, काटकोनांची जोडी, संलग्न कोनांची जोडी आणि विरुद्ध कोनांची जोडी या जोड्यांचे वर्गीकरण करतात. प्रत्येक जोडीतील एका कोनाचे माप दिले असता, दुसऱ्या कोनाचे माप ठरवतात.
07.71.11 त्रिकोणाचे दोन कोन दिले असता, तिसऱ्या कोनाचे माप शोधतात.
07.71.12 चौरसाकार आणि आयताकार आकारांचे क्षेत्रफळ काढतात.
07.71.13 दैनंदिन व्यवहारातील अनुभवांतून जमवलेल्या सांख्यिक माहितीवरून प्रातिनिधिक संख्या (मध्य) काढतात.
07.71.14 स्तंभालेखावरून माहितीचे अर्थनिर्वचन करतात. उदाहरणार्थ, उन्हाळ्यापेक्षा थंडीमध्ये विजेचा वापर जास्त असतो, पहिल्या दहा षटकांमध्ये एखाद्या संघाने काढलेल्या धावा इत्यादी.
07.71.15 त्रिकोणाचे कोनदुभाजक व त्याच्या बाजूंचे लंबदुभाजक काढतात व ते एकसंपाती असतात हे ओळखतात.
07.71.16 विशिष्ट बाजू व कोन दिले असता त्रिकोण काढतात.
07.71.17 कोन, रेषाखंड व वर्तुळ यांची एकरुपता ओळखतात.
07.71.18 मूळ अवयव पाडून संख्याचा मसावि व लसावि काढतात.
07.71.19 त्रिकोणाचे बाह्यकोन ओळखतात.
07.71.20 बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या बेरजेचे सूत्र तयार करतात.
07.71.21 मूळ अवयव पद्धतीने संख्येचे वर्गमूळ काढतात.
07.71.22 दिलेल्या माहितीवरुन जोडस्तंभालेख काढतात व वाचतात.
07.71.23 भागीदारीचे व्यवहार करताना प्रमाणाचा उपयोग करतात.
07.71.24 वर्तुळाच्या परिघाचे सूत्र काढतात व त्याचा उपयोग करतात.
07.71.25 वर्तुळाचा लघुकंस, विशालकंस ओळखतात व कंसाचे माप ठरवतात.
07.71.26 त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र तयार करतात.
07.71.27 घन व इष्टिकाचितीचे पृष्ठफळ काढतात.
07.71.28 पायथागोरसच्या सिद्धांताचा उपयोग करून काटकोन त्रिकोणाची बाजू काढतात.
07.71.29 वर्ग विस्ताराचे सूत्र वापरतात.
07.71.30 व्दिपदीचे वर्ग करतात.
07.71.31 व्दिपदीचे अवयव पाडतात.
इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान अध्ययन निष्पत्ती
अध्ययनार्थी
07.72.01 निरीक्षणक्षम वैशिष्ट्यांच्या आधारे पदार्थ व सजीव (उदा. प्राणीजन्य तंतू, दातांचे प्रकार, आरसे व भिंग, इत्यादी.) ओळखतात. जसे की, त्यांचे स्वरूप, स्पर्श, कार्य इत्यादींच्या साहाय्याने.
07.72.02 गुणधर्म, संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतो. जसे की विविध सजीवांतील पचन; एकलिंगी व उभयलिंगी फुले; उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक; आम्लधर्मी, आम्लारीधर्मी आणि उदासीन पदार्थ; आरसा व भिंगाच्या साहाय्याने तयार होणाऱ्या प्रतिमा, इत्यादी.
07.72.03 गुणधर्म/लक्षणांच्या आधारे पदार्थ व सजीवांचे वर्गीकरण करतात. उदा. वनस्पतीजन्य व प्राणिजन्य तंतू, भौतिक व रासायनिक बदल, इत्यादी.
07.72.04 जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात. उदा. रंगीत फुलांपासून काढलेले अर्क व त्यांचे उपयोग. हिरव्या पानांखेरीज इतर रंगाची पाने प्रकाश संश्लेषण करतील
का? पांढरा प्रकाश हा विविध रंगांचे मिश्रण आहे का ?
07.72.05 प्रक्रिया आणि घटना यांचा कारणांशी संबंध जोडतात. उदा., वाऱ्याचा वेग व हवेचा दाब, वाढणारी पिके व मातीचा प्रकार, खालावलेली पाणी पातळी व मानवी कृती, इत्यादी.
07.72.06 प्रक्रिया आणि घटना स्पष्ट करतात. उदा. प्राणिज तंतूवरील प्रक्रिया; उष्णता संक्रमणाचे प्रकार मानव व वनस्पतींमधील इंद्रिय व इंद्रियसंस्था; विद्युतधारेचे औष्णिक व चुंबकीय परिणाम, इत्यादी.
07.72.07 रासायनिक अभिक्रियांची शाब्दिक समीकरणे मांडतात. उदा. आम्ल-आम्लारी अभिक्रिया, क्षरण, प्रकाश संश्लेषण, श्वसन, इत्यादी.
07.72.08 मापन व गणन करतात. उदा., तापमान, नाडी ठोक्यांचा दर, गतिमान वस्तूची चाल, साध्या दोलकाचा आंदोलन काल इत्यादी.
07.72.09 वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी सूक्ष्मदर्शक, थर्मास फ्लास्क, अपकेंद्री, इत्यादी उपकरणांचा वापर करतात.
07.72.10 आहाराविषयी जागरूक राहून अन्न भेसळ ओळखतात.
07.72.11
विविध भौतिक राशींचे मापन व त्यातील संबंध स्पष्ट करतात.
07.72.12 नामनिर्देशित आकृत्या / प्रवाह तक्ते काढतात. उदा. मानव आणि
वनस्पतींच्या इंद्रियसंस्था; विद्युत परिपथ; प्रयोगाची मांडणी; रेशीम किड्याचा जीवनक्रम, इत्यादी.
07.72.13
आलेख काढून त्याचे अर्थनिर्वचन करतात. अंतर-काल आलेख, ध्वनी वारंवारिता – ध्वनी उच्च नीचता.
07.72.14 परिसरात मिळणारे साहित्य वापरून प्रतिकृती तयार करतात व त्याचे कार्य स्पष्ट करतात. उदा. स्टेथोस्कोप, हवादाब मापक, विद्युतचुंबक, न्यूटनची रंग तबकडी, बेकरी पदार्थ, चुंबक सूची, इत्यादी.
07.72.15
शास्त्रीय शोधांच्या गोष्टींवर चर्चा करतात व त्यांचे महत्त्व जाणतात.
07.72.16
शास्त्रीय संकल्पनांचे दैनंदिन जीवनात उपयोजन करतात. आम्लपित्तावर उपाय करणे /आम्लता हाताळणे, क्षरण रोखण्याचे उपाय, शाकीय पुनरुत्पादनाने शेती करणे, उपकरणांमध्ये दोन किंवा अधिक विद्युत घट योग्य पद्धतीने जोडणे, आपत्तीच्या वेळी व त्यानंतर योग्य ते उपाय करणे/काळजी घेणे; प्रदूषित पाण्याच्या पुनर्वापरासाठी योग्य त्या पद्धती सुचवणे; चुंबकाचे उपयोग; साबण निर्मिती व उपयोग; मिश्रणातील घटक वेगळे करणे इत्यादी.
07.72.17
नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण करून त्यांचे उपयोग स्पष्ट करतात.
07.72.18
पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतात. परिसराच्या स्वच्छतेसाठी चांगल्या सवयी अंगिकारतात. प्रदूषकांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करतात. वृक्षारोपण करतो; नैसर्गिक संसाधनांच्या अतिवापराच्या परिणामांविषयी इतरांना संवेदनक्षम करतात.
07.72.19
नियोजनामध्ये नवनिर्माण क्षमता व उपलब्ध साधनसामग्रीचा सुयोग्य वापर करतात. सर्जनशीलता प्रदर्शित करतात.
07.72.20
प्रामाणिकपणा, वस्तुनिष्ठता, सहकार्य, भय आणि पूर्वग्रह यांच्यापासून मुक्ती ही मूल्ये प्रदर्शित करतात.
07.72.21
सभोवताली घडणाऱ्या आपत्ती जसे की दुष्काळ, महापूर, ढगफुटी, वीज पडणे, वादळे, इत्यादी बाबत जागरूक राहून त्याबाबत उपाययोजनांचा दैनंदिन जीवनात वापर करतात.
07.72.22
माहिती संप्रेषण तंत्रज्ञानांच्या विविध साधनांचा व तंत्राचा वापर करून विविध वैज्ञानिक संकल्पना, प्रक्रिया जाणून घेतात.
07.72.23
अवकाश निरिक्षण करून राशी नक्षत्रे याबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करतात.
इयत्ता सातवी विषय इतिहास अध्ययन निष्पत्ती
अध्ययनार्थी
07.73H.01
इतिहासाची विविध साधने ओळखतात आणि त्यांचा या काळातील इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी उपयोग स्पष्ट करतात.
07.73H.02
इतिहासातील विविध कालखंडांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त साधनांची उदाहरणे देतात.
07.73H.03
मराठे व मुघल संघर्ष चिकित्सकपणे अभ्यासतात.
07.73H.04
शिवराज्याभिषेकामागील कारणे स्पष्ट करतात.
07.73H.05
मध्ययुगातील एका ठिकाणच्या ठळक ऐतिहासिक घडामोडींचा संबंध दुसऱ्या ठिकाणच्या घडामोडींशी लावतात.
07.73H.06
मध्ययुगातील सामाजिक, राजकीय व आर्थिक बदलांचे विश्लेषण करतात.
07.73H.07
छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्करी नियंत्रणासाठी वापरलेले प्रशासकीय मार्ग व व्यूहरचनेचे विश्लेषण करतात.
07.73H.08
मंदिरांचे स्थापत्य, समाधी / थडगे, मशीद यांतील शैली व तंत्रांच्या विकासाचे सोदाहरण स्पष्टीकरण करतात.
07.73H.09
संतांच्या शिकवणुकींतील साम्य ओळखतात.
07.73H.10
भक्ती चळवळ व सूफी पंथातील कविता, अभंग यांतून सध्याच्या सामाजिक स्थितीवरील निष्कर्ष काढतात.
07.73H.11
पानिपतच्या लढाईची कारणमीमांसा करतात.
07.73H.12
मराठी सत्ता अखिल भारतीय पातळीवर प्रबळ सत्ता म्हणून उदयाला आली हे तत्कालीन ऐतिहासिक घटनांच्या मदतीने स्पष्ट करतात.
इयत्ता सातवी विषय भूगोल अध्ययन निष्पत्ती
07.73G.01 पृथ्वीचा कललेला अक्ष, परिवलन व परिभ्रमणामुळे दिवस-रात्र ऋतुनिर्मिती होते हे स्पष्ट करतो.
07.73G.02 पृथ्वीवरील विविध ऋतूंचा सजीवांवर होणारा परिणाम सांगतो.
07.73G.03 पृथ्वीवरील ग्रहणे ही खगोलीय घटना आहे हे ओळखतो.
07.73G.04 ग्रहण संबंधीच्या अंधश्रद्धेचे चिकित्सकपणे परीक्षण करतो.
07.73G.05 मृदा या नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाविषयी संवेदनशीलता दर्शवितो.
07.73G.06 नकाशावरून महाराष्ट्रातील मृदा प्रकार सांगतो.
07.73G.07 हवेच्या दाबाचे परिणाम विशद करतो.
07.73G.08 नकाशातील समदाब रेषांवरून एखाद्या प्रदेशातील हवेचा दाब स्पष्ट करतो.
07.73G.09 वारे निर्मितीची कारणे सांगतो.
07.73G.10 वाऱ्यांचे प्रकार सांगतो.
07.73G.11 वाऱ्याचे परिणाम स्पष्ट करतो.
07.73G.12
सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचा सागरीजलाच्या हालचालीवर होणारा परिणाम सांगतो.
07.73G.13
कृषीपूरक विविध व्यवसाय सांगतो.
07.73G.14
शेतीचे विविध प्रकार सोदाहरण स्पष्ट करतो.
07.73G.15 शेतीसाठी विपणन व्यवस्थेचे महत्त्व सांगतो.
07.73G.16
मानवी जीवनातील व देशाच्या अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व सांगतो.
07.73G.17
प्रदेशातील नैसर्गिक घटकांचा सजीवांवर होणारा परिणाम सांगतो.
07.73G.18 जगाच्या नकाशा आराखड्यात नैसर्गिक प्रदेश दाखवतो.
07.73G.19
वस्त्यांच्या निर्माणामध्ये मानवाने भौगोलिक घटकांचा कसा वापर केला हे सांगतो.
07.73G.20 मानवी वस्ती प्रकारांचा आकृतिबंध ओळखतो.
10/11
07.73G.21 समोच्च रेषा तयार करतो.
07.73G.22 समोच्च रेषा नकाशाचे वाचन करतो.
07.73G.23
समोच्चदर्शक नकाशाचे उपयोग स्पष्ट करतो