सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जूलै २०२४ च्या वेतनासोबत अदा करणे बाबत 7th pay commission installment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता माहे जूलै २०२४ च्या वेतनासोबत अदा करणे बाबत 7th pay commission installment 

संदर्भ-१. शासन निर्णय वेपूर-२०१९/प्र.क्र.८/ सेवा-९/ दि.२०/०६/२०२४

२. शासन पत्र क्र. वेतन १२१९/प्र.क्र १०५/टिएनटी-३/ दि.११/०७/२०२४

उपरोक्त विषयान्वये राज्य शासकीय व ईतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दि.०१ जूलै २०२३ रोजी देय असलेल्या सातवा वेतन आयोग थकबाकीच्या पाचव्या हप्त्याचे प्रदान करणे बाबत शासन निर्णय वित्त विभाग वेपुर/२०१९/प्र.क्र.०८/सेवा-९ दि.२०/०६/२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. त्या नुसार जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा, सर्व शासन अनुदानित संस्थिा मधील पात्र कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारकांना थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून २०२४ च्या वेतन/ निवृत्ती वेतनासोबत अदा करावे असे नमूद आहे. तथापि थकबाकीच्या रक्कमेच्या प्रदानासंबधी संदर्भिय शासन निर्णयातील वाचा क्र.०१ ते ०५ येथिल शासन आदेशातील अन्य ततूदीचे पालन करण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत.

संदर्भिय शासन निर्णयातील संदर्भ क्र.०२ ०३ व ०४ अन्वये ही तरतूद योग्य योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदा व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थानां लागू राहिल असे नमूद आहे.

माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त १०० टक्के खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन २०२४-२५ मध्ये ७ वा वेतन आयोग ०५ वा हप्ता अदा करणेसाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सद्यास्थितीत मंजूर अनुदानाच्या ४२ टक्के अनुदान माहे जूलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग अर्थसं २०२४/प्र.क्र-३४/अर्थ- ०३/दि.०१/०४/२४ नुसार वितरीत करण्यात आले असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपयर्तचे नियमित वेतन अदा करणे क्रमप्राप्त असल्याने नियमित वेतन अदा करणे बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

क्षेत्रिय स्तरावरून सन २०२४-२५ मधील खर्चाची बाब निहाय माहिती संकलित करण्यात आली असून त्यानुसार लेखाशिर्

२२०२०४६९,२२०२०५०२, मध्ये वेतन घेणा-या कर्मचारी यांचे माहे जूलै २०२४ चे वेतन सातवा वेतन आयोग नियमित पाचवा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला १,२,३,४ था हप्ता सह अदा करणे शक्य असल्याने उपरोक्त लेखाशिर्षमध्ये वेतन घेण्या-या पात्र कर्मचारी यांचे माहे जूलै-२४ चे वेतन सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून अदा करण्यात यावे कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

लेखाशिर्ष २२०२३३६१,२२०२०५११,२२०२१९०१,२२०२१९४८,२२०२एच९७३ मध्ये प्राप्त अनुदानातून नियमित वेतनाचा खर्च प्राधान्य क्रमाणे भागविणे क्रमप्राप्त असल्याने अनुदान स्थितीनुसार किंवा अनुदान उपलब्धतेनुसार ७ वा वेतन आयोग फरकाच्या हप्त्याबाबत स्वंतत्र सूचना देण्यात येतील.

Leave a Comment