इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबाबत महत्त्वाच्या सूचना राज्य परीक्षा परिषद पुणे 5th 8th scolarship exam online application instructions 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबाबत महत्त्वाच्या सूचना राज्य परीक्षा परिषद पुणे 5th 8th scolarship exam online application instructions 

ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबत मुद्देनिहाय सूचना (शाळेने विद्यार्थ्यांची माहिती जनरल रजिस्टरमधील नोंदणीप्रमाणे अचूकपणे भरावी.)

1) सर्वसाधारण सूचना :-

• शाळा नोंदणी प्रपत्र भरल्यानंतर आपणास विद्याध्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होतील. लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या Std. 5″ (PUP) या बटनावर क्लिक करावे,

त्यानंतर आपणास Registration व Fee Payment हे दोन पर्याय दिसतील,

Registration या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होईल.

2) विद्यार्थी आवेदनपत्र क्रमांक (Student Application Number) –

• प्रत्येक आवेदनपत्रास स्वतंत्ररीत्या विद्यार्थी आवेदनपत्र क्रमांक सिस्टिमव्दारे जनरेट होईल,

3) फोटो (Photo) –

• प्रत्येक विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी विद्याथ्यांचे फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कैन करुन

जतन करुन ठेवावेत.

विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपध्दती ८.५ से.मी. X. ४.५ से. मी. आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटवून त्याखाली काळया शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी.

फोटो व स्वाक्षरी JPG, JPEG किया PNG या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावा.

फोटो व स्वाक्षरीच्या फाईलची साईज १०० kb पेक्षा जास्त नसावी.

4) विद्यार्थ्यांचे नाव (Student Name) –

आडनाव (Last Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.

प्रथम नाव (First Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.

वडीलांचे नाव (Father’s Name) इंग्रजी कैपिटल लेटर्समध्ये टाईप करा.

आईचे नाव (Mother’s Name) इंग्रजी कैपिटल लेटर्समध्ये टाईप करा.

इंग्रजी कॅपिटल लेटर्स शिवाय इतर कोणतीही लिपी (देवनागरी मराठी हिंदी, इ.) वापरु नये

5) लिंग (Gender) –

ड्रॉप डाऊनमधून MALE / FEMALE या पैकी अचूक पर्याय निवडा.

6) दिव्यांग आहे का? (Are you Differently abled ?) –

• ड्रॉप डाऊनमधून आहे नाही पैकी अचूक पर्याय निवडा.

आहे पर्याय निवडल्यास लेखनिक आवश्यक आहे का? (Do you need a writer for Exam?) असा प्रश्न स्क्रीनवर उपलब्ध होईल.

लेखनिक हवा असल्यास आहे (Yes) हा पर्याय निवडा, नको असल्यास नाही (No) हा पर्याय निवडा,

लेखनिकास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची परीक्षेपूर्वी किमान ४ दिवस अगोदर मान्यता घ्यावी.

7) जन्म दिनांक (Date of Birth)-

शाळेच्या जनरल रजिस्टर / दाखलखारीज रजिस्टरमधील रेकॉर्डप्रमाणे Day, Month, Year या स्वरुपात संबंधित रकान्यात विद्यार्थ्यांची जन्मतारीख नोंदवा. (ड्रॉप डाऊन लिस्टमधून दिवस, महिना, वर्ष निवडा.)

कमाल वयोमर्यादा –

➤ विद्यार्थ्यांचे वय परिक्षेस बसण्याच्या कमाल विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त असल्यास स्क्रीनवर ‘विद्यार्थ्यांचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे, तरीही विद्यार्थ्यांस परीक्षेस प्रविष्ठ होता येईल परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.’ असा संदेश दिसेल.

➤ विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना आवेदनपत्र भरता येईल तसेच परीक्षेस प्रविष्ट होता येईल. मात्र अशा विद्याथ्यांना परीक्षेत कटऑफ इतके अथवा कट ऑफ पेक्षा अधिक गुण मिळाले तरीही त्यांना शिष्यवृत्ती अर्हताधारक घोषित केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

8) महाराष्ट्राचा रहिवासी आहे का? (Are you domicile of Maharashtra?) –

• ड्रॉप डाऊनमधून आहे नाहो पैकी अचूक पर्याय निवडा.

9) आधार कार्ड क्रमांक (Aadhaar No.) किंवा आधार नोंदणी क्रमांक (Aadhaar Enrollment No.) –

विद्यार्थ्यास आधार कार्ड मिळाले असल्यास त्यावरील 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाईप

करावा

विद्यार्थ्यांस आधार कार्ड मिळाले नसल्यास आधार नोंदणी रिसीटवरील 28 अंकी आधार एन्रॉलमेंट क्रमांक टाईप करावा.

विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एन्रॉलमेंट क्रमांक असणे अनिवार्य आहे.

10) आरक्षणाचा प्रवर्ग (Reservation Category) –

शाळेच्या जनरल रजिस्टर / दाखलखारीज रजिस्टरमधील नोंदीप्रमाणे जातीनुसार विद्याथ्यांच्या आरक्षणाचा प्रवर्ग ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूकपणे निवडा. (ड्रॉप डाऊन लिस्ट खुला (GEN), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती अ (VJ-A). भटक्या जमाती व (NT-B), भटक्या जमाती क (NT-C), भटक्या जमाती ड (NT-D), इतर मागासवर्ग (OBC), विषेश मागास प्रवर्ग (SBC))

विशेष सुचना –

• महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून, ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवगीय विद्यार्थ्यांना लागू नाही.

• कोणताही अभ्यासक्रम राबविणा-या शाळांतील उर्वरित SBC, OBC, OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क पुर्ण भरावे लागेल.

• चुकीचा आरक्षण प्रवर्ग नोंदविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकाविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या (MSCERT) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील मागासवर्गीय (SC, ST. VI-A, NT-B, NT-C, NT-D) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा H आणि । शिष्यवृत्ती संचासाठी गुणवत्तेनुसार विचार केला जातो. म्हणून आरक्षण प्रवर्ग अचूक नोंदविणे आवश्यक आहे.

11) परीक्षेचे माध्यम (Medium for Examination) –

शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी निवडलेली माध्यमे ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होतील,

उपलब्ध असलेल्या माध्यमांपैकी विद्याथी ज्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट होणार आहे ते माध्यम निवडा.

सेमी इंग्रजी माध्यम निवडल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर क्र.। मधील गणित या विषयाची व पेपर क्र. 2 मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्हीही माध्यमांतून मिळेल व त्यानुसार गुणदान करण्यात येईल.

12) विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम (Student’s Curriculum) –

शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी शाळेने जो जे अभ्यासक्रम निवडला/ले होता होते. तो/ते अभ्यासक्रम स्क्रीनवर उपलब्ध होईल होतील.

त्यापैकी विद्यार्थी सध्या शाळेत शिकत असलेला अभ्यासक्रम अचूकपणे निवडा,

विशेष सुचना –

महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमात (MSCERT) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो.

चुकीचा अभ्यासक्रम नोंदविल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र ठरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याची शिफारस करण्यात येईल.

13) वडीलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न (Father’s / Parent’s Annual Income) –

वार्षिक उत्पन्न रु.20.000/- (बोस हजार रुपये) पर्यंत किंवा रु.20,000/- (बीस हजार रुपये) पेक्षा जास्त यापैकी अचूक पर्याय निवडा

संबंधित विद्यार्थ्यांकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसल्यास वार्षिक उत्पन्न रु.20.000/- (बीस हजार रुपये) पेक्षा कमी हा पर्याय निवडू नये.

संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.20,000/- (वीस हजार रुपये) पर्यंत असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे (तलाठी तहसीलदार प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरुन तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावे व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करुन द्यावे.

विदर्भातील 11 जिल्ह्यांकरीता राखीव असलेल्या व G या शिष्यवृत्ती संचासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.20,000/- (बीस हजार रुपये) पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार विचार केला जाईल,

14) पालकाचा मोबाईल क्रमांक (Parent’s Mobile No.)

या रकान्यामध्ये विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास नमुद करावा. मात्र अनिवार्य असणार नाही.

15) पालकाचा ईमेल आय.डी. (Parent’s Email ID.) –

या रकान्यामध्ये विद्यार्थ्याच्या पालकांचा ईमेल आय. डी. उपलब्ध असल्यास नमुद करावा, मात्र अनिवार्य असणार नाही.

16) आदिवासी क्षेत्रातील आदिवासी (Are you a tribal from Tribal Sub Plan (T.S.P.) area?) –

• हा पर्याय आदिवासी विद्यानिकेतन प्रवेशाबाबत आहे.

विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी (S.T.) असल्यास होय हा पर्याय निवडावा, आदिवासी क्षेत्रातील नसल्यास नाही हा पर्याय निवडावा.

• याबाबत अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक टि. एस. पी. 1086/8710/प्र.क्र.31/का-5, दि. 9 मार्च, 1990 पहावा.

17) विद्यानिकेतन प्रवेश (Admission To Public School) –

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसमवेत शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. पुढीलपैकी आवश्यक / लागू असलेल्या विद्यानिकेतन प्रवेशाबाबत योग्य ते पर्याय निवडा,

17.1) शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का ? –

• प्रवेश हवा असल्यास आहे पर्याय निवडावा, नको असल्यास नाही पर्याय निवडावा.

• अटी-

* ग्रामीण क्षेत्रातील शासनमान्य शाळेतील इ. 5 वी मध्ये शिकणारा विद्यार्थी प्रवेश परीक्षेस बसू शकतो.

* या विद्यानिकेतनमध्ये केवळ मुलांनाच प्रवेश आहे. (मुलींना प्रवेश नाही).

* फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा. (मराठी इंग्रजी)

* वरील अटींची पुर्तता होत असल्यासच या मुद्दयाचा पर्याय Active राहील.

* वरील अटीत विद्यार्थी बसत नसल्यास या मुद्दयाचा पर्याय Deactive राहील,

17.2) आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का ? –

• प्रवेश हवा असल्यास आहे पर्याय निवडा, नको असल्यास नाही पर्याय निवडा.

अटी-

* विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील रहिवासी असावा.

* तो अनुसूचित जमातीतील (S.T.) असावा.

* या विद्यानिकेतनमध्ये केवळ मुलांना प्रवेश आहे. (मुलींना प्रवेश नाही).

* फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा. (मराठी इंग्रजी)

* वरील अटींची पुर्तता होत असल्यासच या मुद्दयाचा पर्याय Active राहील.

* वरील अटीत विद्यार्थी बसत नसल्यास या मुद्दयाचा पर्याय Deactive राहील.

17.3) विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का?-

प्रवेश हवा असल्यास आहे पर्याय निवडा, नको असल्यास नाही पर्याय निवडा.

• अटी

* राज्य शासनाच्या समाजकल्याण खात्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळेतील इ. 5 वीत शिकणारा विद्याथी असावा.

* या विद्यानिकेतमध्ये दोहोंना (मुलगा व मुलगी) प्रवेश आहे.

* फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातोल असावा. (मराठी इंग्रजी)

* वरील अटींची पुर्तता होत असल्यासच या मुद्दयाचा पर्याय Active राहील.

* वरील अटीत विद्यार्थी वसत नसल्यास या मुद्दयाचा पर्याय Deactive राहील,

18) शुल्क (Fee) –

• शासन निर्णय क्र. एफईडी-4014/643/प्र.क्र.4/एसडी-5, दि. 11/11/2021, दि. 15/11/2016 व

कार्यकारी समिती सभा क्र. 29, दि. 12/04/2018, ठराव क्र. 470 नुसार दर पुढीलप्रमाणे आहेत.

शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- प्रति वर्ष

७.(NTS / NMMS परीक्षेकरीता परीक्षा परिषद शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरीता स्वतंत्रपणे शाळा संलग्नता शुल्क रु.२००/- भरणे अनिवार्य राहील.)

• ऑनलाईन आवेदनपत्रात प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क, विलंब शुल्क, अतिविलंब शुल्क, अत्ति विशेष विलंब शुल्क एकुण शुल्क आपोआप गणले जाऊन संबंधित चौकटीत नोंदविले जाईल. विशेष सुचना –

• प्रवेश शुल्क रु.50/- सर्व विद्यार्थ्यांना (मागासवर्गीय, बिगर मागासवर्गीय व दिव्यांग) लागू आहे.

परीक्षा शुल्क –

• महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून, ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही.

सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुध्दा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.

• उर्वरित SBC, OBC, OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागेल.

19) बैंक खात्याची माहिती (Bank Details) –

• यामध्ये विद्यार्थ्यांची बैंक खात्याची माहिती भरावी.

• विद्यार्थ्यांचे बैंक खाते क्रमांक उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्याच्या आई वडील किंवा पालक यापैकी कोणाही एकाच्या आधारकार्डशी संलग्न बैंकखात्याची (बैंक खातेधारकाचे नाव, बैंक खाते क्रमांक, IFS CODE, बँकेचे नाव व शाखेचे नाव) माहिती भरावी.

विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी आधारकार्डशी संलग्न बैंक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे.

20) महत्त्वाचे

• उपरोक्तनुसार ऑनलाईन आवेदनपत्रातील सर्व माहिती भरल्यानंतर Save & Preview या बटनावर क्लिक करावे,

आपणास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन भरलेले आवेदनपत्र स्क्रिनवर दिसेल.

ऑनलाईन आवेदनपत्रात काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करुन दुरुस्ती करता येईल.

ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करुन Submit या बटनावर क्लिक करावे,

• Dashboard मध्ये आपल्या शाळेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी Pending Payment Student List मध्ये दिसेल.

21) Fee Payment –

• डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या Std. 5″ (PUP) यामधील Fee Payment या बटनावर क्लिक करावे.

• क्लिक केल्यानंतर आपणास Pending Payment Student List मध्ये आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित यादी दिसेल, सदर यादीतील एखाद्या विद्यार्थ्यांचे शुल्क आपणास भरावयाचे नसल्यास त्या विद्यार्थ्यांच्या नावासमोरील चेकबॉक्स वर क्लिक करुन Deselect करावे.

त्यानंतर स्क्रीनवरील उजव्या बाजूस असणाऱ्या Proceed to Payment या बटनावर क्लिक करावे. किनक केल्यानंतर Payment Gateway चे पेज स्क्रिनवर दिसेल, त्यावरील CONFIRM & PAY या बटनावर क्लिक केल्यानंतर योग्य त्या पर्यायाची निवड करुन आवश्यक माहिती भरावी व Make Payment या बटनावर क्लिक करुन प्रक्रिया पुर्ण करावी.

त्यानंतर आपणास भरलेल्या शुल्काची ऑनलाईन रिसीट प्राप्त होईल. ती आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावी.

ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची नावे Successfully Registered Student List मध्ये दिसतील व सदर विद्यार्थ्यांच्या Registration ची प्रक्रिया पूर्ण होईल.

• Successfully Registered Student List मध्ये दिसणारे विद्यार्थीच परीक्षेस पात्र ठरतील.

परीक्षा शुल्क भरल्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्याथ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.

उपरोक्त बाबीं व्यतिरिक्त आणखी काही अडचण असल्यास 020 67351700 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment