अध्ययन स्तर निश्चिती इ.2 री ते 5 वी अध्ययन क्षमता पडताळणी तक्ता pdf निपुण भारत अभियान अंतर्गत nipun bharat adhyan starnishchhiti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अध्ययन स्तर निश्चिती इ.2 री ते 5 वी अध्ययन क्षमता पडताळणी तक्ता pdf निपुण भारत अभियान अंतर्गत nipun bharat adhyan starnishchhiti 

निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती – इयत्ता 2री

वाचन अध्ययन क्षमता इ. 2री –

१. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी (उच्चार) ओळखत नाही.

२. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी (उच्चार) ओळखतो.

३. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो.

४. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो.

५. मजकूरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो.

६. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

७. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.

८. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.

९. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१०. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.

११. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी व तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.

१२. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१३. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तथार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.

१४. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.

इयत्ता दुसरी स्तर निश्चिती pdf उपलब्ध 

इयत्ता दुसरी स्तर निश्चिती पडताळणी तक्ता येथे पहा

लेखन अध्ययन क्षमता इ. 2री –

१. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही.

२. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो.

३. सोपे शब्द पाहून लिहितो.

४. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला (उच्चार) ऐकून अक्षरे लिहितो.

५. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.

६. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.

७. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हेयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो.

८. २-३ शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो.

९. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्ये पाहून लिहितो.

१०.२-३ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

११. २-३ शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्ये ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.

१२. २-३ सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

१३.२-३ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

१४. श्रुतलेखनाकरिता ४-५ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो.

१५. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो.

१६. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.

संख्याज्ञान Numeracy अध्ययन क्षमता इ. 2री

१. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत.

२. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणतो.

३. ० ते ९ पर्यंतच्या वस्तू मोजतो.

४. ९ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.

५. ० ते ९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.

६. ० ते ९ पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)

७. १० ते २० संख्यानामे क्रमाने म्हणतो.

८. १० ते २० पर्यंतच्या वस्तू मोजतो.

९. २० पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.

१०. १० ते २० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.

११. १० ते २० पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)

संख्यावरील क्रिया Number Operations अध्ययन क्षमता इ.2 री

१. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.

२. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.

३. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.

४. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

५. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो.

६.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.

७. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

८. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडवितो.

९. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.

१०.० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

११.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.

१२.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.

१३.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती – इयत्ता 3री ते 5वी

वाचन अध्ययन क्षमता इ. 3री ते 5वी

इयत्ता तिसरी ते पाचवी स्तर निश्चिती pdf उपलब्ध

इयत्ता तिसरी ते पाचवी स्तर निश्चिती पडताळणी तक्ता येथे पहा

१. वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही.

२. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखतो.

३. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो.

४. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो.

५. मजकूरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो.

६. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

७. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्ये वाचतो.

८. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.

९. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१०. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षर युक्त लहान वाक्ये वाचतो.

११. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.

१२. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१३. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.

१४. अपरिचित मजकूरातील ६-८ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१५. अपरिचित मजकूरातील ६-८ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह, योग्य गतीने व आकलनासह वाचतो.

लेखन अध्ययन क्षमता इ. 3री ते 5वी

१. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही.

२. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो.

३. सोपे शब्द पाहून लिहितो.

४. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला (उच्चार) ऐकून अक्षरे लिहितो.

५. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.

६. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.

७. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो.

८. २-३ शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो.

९. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्ये आकलनासह पाहून लिहितो.

१०. २-३ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

११. २-३ शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.

१२. २-३ सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

१३. २-३ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

१४. श्रुतलेखनाकरिता ४-५ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो.

१५. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.

१६.४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.

१७. ६-८ शब्दांची चार ते पाच सोपी वाक्ये ऐकून

लिहितो.

१८. श्रुतलेखनाकरिता ६-८ शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त चार ते पाच वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह लिहितो.

संख्याज्ञान Numeracy अध्ययन क्षमता इ. 3री ते 5वी

१. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत.

२. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणतो.

३. ० ते ९ पर्यंतच्या वस्तू मोजतो.

४. ९ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.

५. ० ते ९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.

६. ० ते ९ पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)

७. १० ते २० संख्यानामे क्रमाने म्हणतो.

८. १० ते २० पर्यंतच्या वस्तू मोजतो.

९. २० पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.

१०. १० ते २० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.

११. १० ते २० पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)

१२. २१ ते ५० पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो.

१३. स्थानिक किंमत संकल्पना वापरून २१ ते ५० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.

१४. २१ ते ५० पर्यंतच्या संख्या लिहितो. (अंकी)

१५. ५१ ते ९९ पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो.

१६. स्थानिक किंमत संकल्पना वापरून ५१ ते ९९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.

१७. ५१ ते ९९ पर्यंतच्या संख्या लिहितो. (अंकी)

१८.० ते ९ संख्यानामे लिहितो. (अक्षरी)

१९. ० ते २० संख्यानामे लिहितो. (अक्षरी)

२०. ० ते ५० संख्यानामे लिहितो. (अक्षरी)

संख्यावरील क्रिया अध्ययन क्षमता इ. 3री ते 5वी

१. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.

२. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.

३. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.

४. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

५. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.

६. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.

७. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

८. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो.

९. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.

१०.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

११.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.

१२.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.

१३.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

१४.० ते २० पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.

१५.० ते २० पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.

१६.० ते २० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

१७. ० ते २० पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.

१८.० ते २० पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.

१९.० ते २० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

२०.० ते ५० पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.

२१.० ते ५० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

२२.० ते ५० पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.

२३.० ते ५० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

२४. स्थानिक किमत संकल्पना वापरून ० ते ९९ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. (बिनहातच्याची)

२५. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. (हातच्याची) (यांचे उत्तर ९९ पर्यंत आहे)

२६.० ते ९९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. (ज्यांचे उत्तर ९९ पर्यंत आहे)

२७. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. (बिनहातच्याची)

२८. स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. (हातच्याची)

२९.९९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

Join Now