प्रयोग क्रं -1
हवेचा दाब ऑटोमायजर किंवा स्प्रे पंपाचा अभ्यास
काय पाहिजे??
साहित्य स्ट्रॉ, काचेचा ग्लास, पाणी
काय करायचे??
एक स्ट्रा घ्या, त्याच्या एका बाजूने म्हणजे एकूण लांबीच्या तीन भाग अंतर सोडून स्वी कटर किंवा ब्लेंडच्या सहाय्याने अर्ध्यापेक्षा थोडा जास्त कापा.
एक ग्लास मध्ये पाणी घ्या. कापलेल्या भागापासून स्ट्रा किंचित कोनाकारात [आकार (v)
(L)] दुमडा. म्हणजे स्ट्रा ची एक बाजू उभी व एक काहीशी आडवी होईल. स्ट्रा ची लहान (कमी लांबीच लांबीची) बाजू पाण्याने भरलेल्या ग्लासात बुडवा. स्ट्रा चे दुसरे टोक तोंडात धरून
जोरात फुंका.
काय होते??
ग्लासातील पाणी स्ट्राच्या फटीतून बाहेर फेकले जाते.
हे कशामुळे घडले??
तोंडाने जोरात हवा फुंकल्यामुळे स्ट्रा च्या कापलेल्या फटीजवळ हवेचा दाब कमी होतो व ग्लासात असलेले सामान्य दाबतील पाणी कमी दाबकडे वरती येते व हवेमुळे बाहेर फेकले जाते.
या तत्याचा वापर कोठे केला जातो??
याचा वापर परफ्युम व औषधी बाटल्यातील स्प्रे मध्ये दिसून येतो
प्रयोग क्रं-2
जडत्व – न्यूटनच्या गतीविषयक पहिला नियम
काय हवे?
साहित्य : एक काचेचा पेला, एक पोस्टकाडर, एक जड नाणे.
काय करायचे?
कृती : एक काचेचा रिकामा पेला घ्या. त्याला टेबलावर सरळ उभा ठेवा. पेल्याच्या तोंडावर एक सपाट पोस्टकाडर ठेवा. पोस्टकार्ड जुने असले तरी चालेल पण त्याला घडी पडलेली नसावी. ह्या पोस्टकार्डावर एक रुपयाचे नाणे ठेवा. तुमच्या मित्राला टिचकी मारून पोस्टकार्ड व नाणे दूर उडविण्यास सांगा. तुमचा मित्र अनेक प्रयत्न करेल पण जमणार नाही. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तुम्हाला सुद्धा नाणे आणि कार्ड दोन्हीही दूर उडविणे जमणार नाही.
काय दिसते? : कितीही जोराने टिचकी मारली तरी फक्त कार्ड दूर उडून पडेल पण नाणे मात्र
पेल्यातच पडेल.
वैज्ञानिक तत्त्व : हे न्यूटनचा पहिला नियम (जडत्वाचा नियम) यानुसार घडते. ज्यानुसार मुळात स्थिर किंवा निश्चल असलेली वस्तू जोवर तिच्यावर कोणत्याही बाह्य बलाचा प्रभाव पडत नाही तोवर स्थिरच राहते. तसेच जी वस्तु गतिमान आहे तीही बाह्य बलाच्या प्रभावाअभावी एकाच दिशेने त्याच वेगाने मार्गक्रमण करत राहते. वस्तूंच्या या अंगभूत गुणधर्माला जडत्व (निरुढी, इनर्शिया, Inertia) असे म्हणतात.
(सोबत प्रयोगाची आकृती देत आहोत)
प्रयोग क्रं -3
विद्युत-चुंबक तयार करणे : खिळ्याची जादू
काय हवे??
साहित्य :- दोन इंच लांबीचा एक लोखंडी नट-बोल्ट, टॉर्चचे २ सेल, इनॅमल्ड वायर/तांब्याची बारीक तार (वाईडिंग वायर), कागद वगैरे.
कृती :- प्रथम नट-बोल्टावर कागदाचे दोन-तीन वेढे गुंडाळून घ्या. त्यावर वाईडिंग/तांब्याच्या वायरचे १५० वेढे गुंडाळा. वायस्चे पहिले व शेवटचे टोक बाहेर ठेवा. ह्या टोकांना ब्लेडने घासून वरील आवरण खरडून एक इंच भाग चकचकीत करा. नंतर ह्या दोन टोकांपैकी एक टोक सेलच्या पितळी टोपणास व एक टोक खालील बुडास लावा. काही बारीक खिळे किंवा टाचण्या नट बोल्टाजवळ आणा.
काय दिसते??
त्या नटाला पक्क्या चिकटून बसतात. वायरचे टोक सेलपासून दूर केले, की टाचण्या गळून पडतात.
हे कशामुळे झाले??
जोपर्यंत विजेचा प्रवाह वट-बोल्टाभोवती फिरत असतो, तोपर्यंत त्यात चुंबकत्व असते. प्रवाह बंद झाला, की त्यात आलेले चुंबकत्व नाहीसे होते.
यावरून काय समजले?
एखाद्या नरम लोखंडाच्या तुकड्यावर रोधीत तारेचे वेडे देऊन त्यातून विद्युत प्रवाह वाहू दिला तर लोखंडाच्या तुकड्यात चुंबकत्वाचा गुणधर्म येतो. जोपर्यंत विद्युत प्रवाह चालू आहे तोपर्यंत लोखंडाचा तुकडा चुंबकत्वाचे गुणधर्म दाखवतो.
प्रयोग क्रं-4
प्रकाशाच्या वक्रीभवणाचे तत्य
काय हवे??
साहित्य: एक नाणे, एक छोटी वाटी, पाण्याने भरलेली बादली इ.
काय करायचे??
कृती : एक मोठी बादली घ्या. ह्या बादलीत पाणी भरून घ्या. नाण्यापेक्षा किंचित्त मोठी असणारी वाटी घ्या. ही वाटी बादलीतील पाण्यात बुडाशी ठेवा. तुमच्या मित्राच्या हातात नाणे घा व त्याला बादलीच्या वर हात करून ते नाणे पाण्यातील वाटीत नेम धरून टाकण्यास सांगा.
काय होते??
कितीही नेम धरून नाणे पाण्यात टाकले तरी ते पाण्यातील वाटीत पडत नाही. वाटीच्या बाहेरच पडते.
हे कशामुळे झाले??
पाण्याच्या बाहेरून पाहिल्यावर दिसणारी वाटी व प्रत्यक्षात पाण्यातील वाटीची जागा यात फरक असतो.
यावरून काय समजले??
वक्रीभवन – जेव्हां प्रकाशाचे किरण एका पारदर्शक पदार्थांतून दुसऱ्या पारदर्शक पदार्थात जातात तेव्हां ते आपला सरळ मार्ग सोडून थोडेसे वक्र होतात. किरणाच्या दिशेंत हा जो बदल होतो,
त्यास वक्रीभवन असे म्हणतात.
(सोबत प्रयोगाची आकृती दिली आहे)
प्रयोग क्रं-5
द्रव्याचा पृष्ठीय ताण (surface tension)
काय हवे??
साहित्य : प्लॅस्टिकचा मोठा डबा, बारीक खिळा, पाणी.
काय करायचे??
कृती : खाण्याचे तेल, खोबरेल तेल ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या रिकामा डबा किंवा बरणी घ्यावी. बारीक खिळा स्टोव्हवर किंवा गॅसवर गरम करून त्या डब्याच्या एका बाजूला बुडाजवळ शेजारी शेजारी पाच बारीक छिद्र पाडा
डब्यात पाणी भरा.
काय दिसते??
पाच छिद्रातन पाण्याच्या पाच धारा अलग अलग पडू लागतील. आता त्या धारा हाताचा अंगठा आणि बोट यांच्या चिमटीत (मुठीत) धारा एकत्र करून दाबा.
काय होते??
5 सगळ्यांची मिळून एक धार तयार होते. ती खाली पड़ लागते.
पुन्हा सर्व छिद्रावरून हात फिरवा.
काय होते?
पडू लागतात. पाच धारा अलग अलग पडू लागतात.
यावरून काय समजले?? पाण्याच्या कणानी एकमेकांनी आकर्षन घेतल्यामुळे म्हणजेच
पृष्ठताणामुळे असे घडते. द्रवाच्या पृष्ठभागावरील कणावर खालून व कडेने आकर्षण असून वरचा भाग मुक्त असतो. त्यामुळे पृष्ठभागाकडील कण एकमेकांकडे व द्रव्यांतर्गत भागाकडे खेचले जातात. त्यामुळे द्रव्याचा पृष्ठभाग एखाद्या लवचिक पापुद्र्या सारखा दिसू लागतो या परीणामालाच द्रव्याचा पृष्ठीयताण असे म्हणतात.
(सोबत प्रयोगाची आकृती जोडत पाठवत आहोत)
प्रयोग क्रं -6
वस्तूच्या प्रतिमांचा अभ्यास झाडाची उंची मोजणे
काय पाहिजे ??
साहित्य झाड, मोबाईल, एक व्यक्ती, मोजपट्टी.
काय करायचे??
कृती – एक व्यक्ती निवडा. तिची उंची मोजा (h). ज्या झाडाची उंची मोजायची आहे त्याच्याशेजीरी तिला उभे करा. फोटो काढता येणारा मोबाईल घ्या. फोटोच्या चौकटीत ते झाड
आणि ती व्यक्ती पूर्ण मावेल असा फोटो घ्या.
आता काय करायचे??
व्यक्तीची फोटोतली उंची मोजा (fl).
या उंचीने व्यक्तीच्या उंचीला भागून (h/fl) येणारी पट (p) काढा.
(h भागिले fl = p)
फोटोतील झाडाची उंची मोजा (f2).
या उंचीला पटीने गुणा (f2 गुणिले p).
झाडाची उंची मिळेल.
यावरून काय समजले??
फोटोत सर्व वस्तूंच्या प्रतिमा एकाच पटीत बदलतात.
प्रयोग क्रं-7
तापमापी किंवा थर्मामिटस्चे तत्व
काय पाहिजे??
साहित्य : छोटी प्लॅस्टिकची बाटली व झाकण, बॉलपेनची रिकामी रिफिल/पारदर्शी स्ट्रॉ, गरम पाण्याचे मोठे भांडे, थंड रंगीत पाणी.
काय करायचे??
कृती : एक प्लॅस्टिकच्या बाटली घ्या. बाटलीच्या झाकणाला बॉलपेनची नळी/स्ट्रॉ घट्ट बसेल असे छिद्र पाडा. बाटलीत रंगीत पण थंड पाणीपूर्ण भरा. तिच्या तोंडात झाकण बसवा.
काय दिसते??
बाटलीतील थोडे रंगीत पाणी रिफिल / स्ट्रॉत वर चढले. तेथे खून करा. पाणी रंगीत असल्यामुळे स्पष्ट दिसेल. नंतर ही बाटली उचलून गरम पाणी असलेल्या भांड्यात बुडवा व नळीतील रंगीत पाण्याकडे लक्ष केंद्रित करा.
काय दिसते??
थोड्या वेळाने नळीतील रंगीत पाणी वर वर चढू लागते व खूण केलेल्या ठिकाणापासुन नळीत
बरेच वर चढते.
हे कशामुळे झाले??
लहान बाटलीत थंड पाणी होते. बाटली गरम पाण्यात बुडविल्यामुळे थंड पाणी गरम होते व त्याचे आकारमान वाढते. हे आकारमान बाटलीतं मावत नाही. म्हणून ते नळीत वर चढते.
यावरून काय समजले??
उष्णतेमुळे द्रव पदार्थ प्रसरण पावतात व थंड होताच अंकुचन पावतात.
या तत्वाचा वापर कोठे केलेला दिसतो ??
आपल्या शरीराचे व वातावरणाचे तापमान मोजण्यासाठी वापरलेला थर्मामिटर तयार
करण्यासाठी, ज्यात पांढरा चकचकीत पारा असतो.
(सोबत प्रयोगाची आकृती देत आहोत)
प्रयोग क्रं -8
वाहत्या हवेतील गतिज ऊर्जा टर्बाईन तयार करणे
काय हवे??
साहित्य : जुने पोस्टकार्ड, टोकदार पेन्सिल, मेणबत्ती, मातीचा गोळा
काय करायचे??
कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे पोस्टकार्डा पासून एक पट्टी कापून घ्या. तिच्या लांबीच्या मध्यावर खूण करा. आकृतीत दाखविल्याप्रमाणे या मध्यबिंदूतून जाणारी एक तिरपी रेषा काढा. त्या रेषेवर घडी घाला.
घडीच्या मध्यभागी थोडा गडडा (खोलगट भाग) पाडा. पेन्सिलचे टोकदार टोक वर राहील अशा रीतीने त्याला मातीच्या गोळ्यात उभे करा. वरच्या तीक्ष्ण टोकावर आधी तयार केलेले टर्बाईन ठेवा. या टर्बाईनच्या खाली जळती मेणबत्ती ठेवा.
काय दिसते??
थोड्याच वेळात टर्बाईन फिरू लागते व मेणबत्ती पेटलेली आहे तो पर्यंत ते फिरत राहते.
हे कशामुळे झाले??
तत्त्व : गरम हवा हलकी होऊन वर जाते व टर्बाईनच्या पात्यांना गती देते. यावरून काय समजले??
वेगात वाहणाऱ्या हवेत /वाऱ्यात गतिज ऊर्जा असते. या ऊर्जेमुळे त्या प्रवाहात येणाऱ्या वस्तूही
गतिमान होतात.
या तत्याचा वापर कोठे केला जातो ??
जेम्स वॅटचे वाफेचे इंजन, पवनचक्की इ ठीकाणी
प्रयोग क्रं -9
प्रकाश किरणांची रचना रंगीत भिंगरी झाली पांढरी
काय पाहिजे??
साहित्य : जाड पुड्याचा तुकडा, कंपास पेटी, रंगाची पेटी, पेन्सीलीचा तुकडा.
काय करायचे??
कृती : जाड पुड्याच्या तुकड्यावर कंपासच्या साहाय्याने एक वर्तुळ काढा. वर्तुळाचा आकार वाटीएवढा असावा. हे वर्तुळ कापून घ्या व त्यावर पांढरा कागद चिकटवून घ्या. ह्या पांढच्या वर्तुळाचे समान ७ भाग करून प्रत्येक भाग खाली दिलेल्या क्रमाने रंगाने रंगवा, तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, पारवा, निळा, जांभळा हे ते सात रंग आहेत. पेन्सिलीचा तुकडा घेऊन त्याला एका बाजूने छिलून काढून दुसरीकडून सपाट राह द्या. अगोदर तयार केलेल्या वर्तुळाच्या मध्यबिंदूच्या ठिकाणी पेन्सिलचा तुकडा जाईल एवढे छिद्र पाडा. पेन्सिल व पुट्टा यांच्या मधील भेग फेव्हीकॉल लावन बुजवा. तयार झाली तुमची भिंगरी. नावन बुजय ही भिंगरी टेबलावर टेबलावर फिरवा.
काय दिसते??
निरीक्षण : ही भिंगरी सात रंगाची बनलेली आहे पण जेव्हा ती जोराने फिरते त्यावेळी पांढऱ्या
मातकट रंगाचा बनलेली आहे असे वाटते.
हे कशामुळे झाले??
निष्कर्ष/अनुमान : प्रकाश हा सात रंगानी बनलेला असतो. ते सात रंग तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, पारवा, निळा, जांभळा हे आहेत. भिंगारीच्या वेगाने फिरण्यामुळे सात रंगांच्या
प्रयोग क्रं-10
उच्चालक प्रेरणा’ (LIFT FORCE): विमान हवेत उडण्याचे तंत्र
काय पाहिजे?
साहित्य : ३० सेंमी x ५ सेंमीचा एक तुकडा, पेन्सिल
काय करायचे?
कृती : ३० सेंमी x ५ सेंमीचा एक तुकडा घ्या. अरुंद टोकाकडून तो कागद दोन्ही हातांनी धरा आणि त्याच्यावर जोरात फुकर मारा. कागद वर उचलला जाईल.
हे कशामुळे झाले?
कागदाच्या वरून जाणाच्या हवेचा वेग कागदाच्या खालून जाणाच्या हवेच्या वेगापेक्षा जास्त असतो. त्यामुळे कागद वर उचलला जातो. आता ५ सेंमीकडचे दोन्ही कोपरे एकत्र करा.
त्यात पेन्सिल घाला.
आकृतीत दाखवल्याप्रमाणे टेबलाच्या एका कोप-याला अडकवून ठेवा आणि कागदाच्या वरच्या बाजूने जोरात फुकर मारा.
काय दिसते?
कागद वर उचलला जाईल,
क्ष
यावरून काय समजले?
पंखांच्या वरच्या आणि खालच्या हवेच्या दाबामधला फरक आणि त्यामुळे निर्माण होणारी शक्ती याला ‘उच्चालक प्रेरणा’ (LIFT FORCE) असं म्हणतात.
कागदाचा हा आकार विमानाच्या पंखासारखा असतो.
प्रयोग क्रं -11
केंद्रोत्सारी बल (Centrifugal Force) कितीही व कसेही फिरवा – पाणी सांडत
नाही
काय पाहिजे??
साहित्य : रंगाचा रीकामा डबा, दोरी, पाणी.
काय करायचे??
कृती : ऑईलपेटचे रिकामे डबे, बोर्नव्हिटाचे रिकामे डबे आपल्या घरात पडलेले असतात. त्यापैकी एक डबा घ्या. ह्या डब्याचे झाकण काढून टाका. डब्याच्या तोंडाजवळच्या काठावर समान अंतरावर तीन छिद्र पाडा. ह्या छिद्रात दोरीचा एक एक तुकडा घट्ट बांधा दोरीची उरलेली तीन टोके समान लांबीची ठेवून तेथे गाठ पाडा. ही गाठ हातात धरली म्हणजे डबा सरळ उभा राहिला पाहिजे. ह्या गाठीजवळ दुसरी लांब दोरी घट्ट बांधा. डबा पाण्याने पूर्ण भरा. लांब दोरी हातात धरून डब्याला मागे पुढे झोके या. झोका मोठा मोठा करीत न्या व पटकन त्याला
आपल्या भोवती गरगर फिरख लागा.
काय दिसते??
झोका देत असताना पाणी सांडले नाही. डबा आपल्या डोक्याभोवती फिरत आहे तो आडवा आहे तरी त्याच्यातील पाणी सांडत नाही.
ही गतीत फिरविला डबा कितीही जोराने कोणत्याही गतीत फिरविला तरी त्याच्यातील पाणी खाली पडत नाही व त्याही गर्ने
सांडत नाही.
हे कशामुळे झाले??
डबा गोल फिरवल्यामुळे डब्यातील पाणी डब्याला चिकटून बसते त्यामुळे सांडत नाही.
यावरून काय समजले??
एखादी वस्तू गोलाकार फिरत असताना त्या वस्तूवरील प्रत्येक कण त्या वस्तूच्या
मध्यबिंदूपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात यालाच केंद्रोत्सारी बल (Centrifugal Force) म्हणतात.
कुठलीही वस्तू जेव्हा एका केंद्राभोवती फिरत असते, तेव्हा त्या वस्तूवर बाहेर फेकले जाणारे बल कार्यरत होत असते. उदा जत्रेतल्या एका आसाभोवती फिरणाऱ्या पाळण्यात बसल्यावर अनुभवलेले आहे. किंवा वेगाने जाणाऱ्या गाडीत बसलो असता वळणावर आपले शरीर वळणाच्या दिशेच्या विरुद्ध दिशेला झुकणे हाही केंद्रोत्सारी बलाचाच परिणाम आहे.
प्रयोग क्रं-12
द्रव्याचा पृष्ठीय ताण (surface tension) सूर्यावरचे डाग घरात पहा
काय पाहिजे??
साहित्य आरसा, कागद, कात्री, पट्टी, पेन्सिल, कंपास.
काय करायचे??
कृती – एका ए4 आकाराच्या कागदावर मध्यभागी एक सेंटिमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या. तो कागद एका आरशावर चिकटवा. आरसा घराबाहेर उन्हात ठेवा. वर्तुळाकार भोकातून येणारा कवडसा भिंतीवर पडू द्या. आस्सा भितीपासून दूर असेल तेवढा कवडसा मोठा पडेल. कवडसा वगळता बाकी येणारे उजेड कमीतकमी करा. यासाठी आरशाच्या इतर भागावर कापड गुंडाळता येईल.
आता काय दिसते??
कवडशामध्ये काही काळसर ठिपके दिसतील ते पांवरचे डाग आहेत. कवडशात ढगही
हालताना दिसतील.
हे कशामुळे दिसते??
आरशावरून परावर्तित झालेला सूर्यप्रकाश कमी प्रखर होती, तो भिंतीवर पडून परावर्तीत होताना त्याची प्रखरता आणखी कमी होते आणि बारकावे दिसायला लागतात.
प्रयोग क्रं-13
न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम हवा जाई खाली, फुगा जाई वर,
काय हवे??
साहित्य : एक फुगा, चिकटपट्टी, बॉलपेनची रिकामी नळी, बारीक दोरा.
काय करायचे??
कृती : फुग्याच्या तोंडात बॉलपेनची रिकामी नळी बसवा व दोच्याने त्या भोवती बरेच वेढे द्या. त्यामुळे नळी फुग्याच्या तोंडात घट्ट बांधली जाईल. फुग्यात हवा भरावयाची असेल तर ह्या नळीतून फुंकून हवा भरावी लागेल.
टेबलाच्या वरच्या टोकाला एक बारीक खिळा ठोका. बॉलपेनच्या नळीच्या एका तुकड्यात दोरा ओवून त्याचे टोक खिळ्ळ्याला बांधा. जमिनीवर एक वीट ठेवा. त्या विटेला दोच्याचे दुसरे टोक बांधा. वीट मागे सरकवुन दोरा ताठ करा. दोच्यात ओवलेली बॉलपेनची नळी दोऱ्याच्या तळाजवळ आलेली आहे. ह्या नळीजवळ फुगा लावून चिकटपट्टीने दोन ठिकाणी नळी व फुगा चिकटवून टाका. फुग्याच्या चिकटपट्टीमुळे फुगा दोन्यात ओवलेल्या नळीला जोडला जाईल. फुग्याच्या नळीला तोंड लावून फुग्यात हवा भरा. नळीच्या तोंडावर बोट दाबून धरून फुगा दौऱ्याच्या तळाशी विटेजवळ आणा. नळीवरील बोट काढून घ्या व फुयाला सोडून द्या.
काय होते??
फुग्यातील हवा नळीतन खाली येणे सुरू होते व फुगा दोऱ्यातून वर चढत चढत टेबलापर्यंत येतो. त्यातील हवा संपली म्हणजे घसरत घसरत पुन्हा खाली येतो. तेथे पुन्हा त्यात हवा भरून सोडले
म्हणजे तो पुन्हा वर येतो.
यावरून काय समजले??
तत्त्व : हवा खाली जाण्याची क्रिया करते त्यामुळे त्याच्या उलट फुगा वर चढण्याची प्रतिक्रिया घडते.
हे सर्व न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम प्रत्येक वस्तूवर एखादे बल ज्या दिशेने व ज्या प्रमाणात कार्य करते त्याच्या उलट दिशेने व त्याच प्रमाणात त्या वस्तूची प्रतिक्रिया कार्य करते
या नुसार घडले. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच.
प्रयोग क्रं-14
मेंदूचे कार्य – रंग वाचता येतात की शब्द?
काय हवे??
साहित्य – कोरा कागद, पेन्सिल, रंगीत खडू किंवा ब्रश – रंग
काय करायचे??
कृती – एक कोरा कागद घ्या. त्यावर पेन्सिलिने मोठ्या पुसट अक्षरात तुम्हाला माहिती असलेल्या रंगांची नावे लिहा. ती नावे कोणताही दुसरा रंग वापरून ठळक करा. उदा. लाल हा शब्द (काळ्या रंगाने), पिवळा (जांभळ्या रंगाने)., निळा (तपकिरी रंगाने), हिरवा (लाल रंगावे), तपकिरी (पिवळ्या रंगाने), नारंगी (निळ्या रंगावे), जांभळा (पोपटी रंगाने) क्षीरसाग
अशी सर्व अक्षरे वेगळ्या रंगांनी रंगवा.
आता काय करायचे??
शब्द न वाचता रंग मोठ्याने वाचून दाखवायला इतरांना सांगा.
काय दिसून येते??
आपण रंगाऐवजी शब्दच वाचतो.
हे कशामुळे होते?
आपला मेंदू वाचनाची क्रिया रंगाऐवजी शब्दांशी जोडतो असे आढळते.
प्रयोग क्रं-15
पदार्थाच्या कणामधील आकर्षण
काय पाहिजे??
साहित्य- पाणी, पाण्याचा मग, प्लॅस्टिकचे झाकण, वाटी इ
कसे करायचे??
कृती- एका मगमध्ये पाणी भरून घ्या. छोट्या प्लॅस्टिकच्या बाटलीचे झाकण घ्या.
धरून हलकेच मगमधल्या पाण्याच्या मध्यभागी ठेवा.
काय होते??
झाकण कडेकडे सरकते. कितीही वेळा करून खात्री करून घ्या.
पाण्याच्या मग ऐवजी त्यापेक्षा मोठ्या तोंडाचे भांडे घेऊन काय फरक पडतो, ते पहा.
हे कशामुळे होते??
पाण्याच्या कणांमध्ये एकमेकांशी असलेल्या ओढीच्या जोरापेक्षा पाण्याच्या कणांना मगच्या कणांशी ओढीचा जोर जास्त असतो. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाची ओढ झाकणाला कडेकडे ढकलते.
आता एका वाटीत पाणी घेऊन मगमध्ये थोडे थोडे टाका. पाण्याची पातळी मगच्या कडेच्या वर
जाईल
आता काय दिसते??
कडेला गेलेले झाकण मध्याकडे सरकताना दिसते.
हे कशामुळे होते??
मगच्या पातळीच्या वर असलेल्या पाण्यातील कणांची ओढ त्यांना एकमेकांजवळ आणते, त्याबरोबर झाकणही मध्याकडे ढकलले जाते.
प्रयोग क्रं-16
जडत्वाचा नियम – लाकडी पट्टीची जादू
काय पाहिजे??
साहित्य : शिवण्याच्या दोऱ्याचे दोन तुकडे, लाकडी पट्टी, धातूची जाड पट्टी किंवा सळई इ
काय करायचे??
साहित्य : लाकडाची एक फूट लांबीची पट्टी घ्या. या पट्टीच्या प्रत्येक टोकाजवळ दोड्याचे तुकडे पक्के बांधा, कापड शिवण्यासाठी जो दोरा वापरतात तसा दोरा वापरा. दोऱ्याची मोकळी टोके अशा ठिकाणी घट्ट बांधा कि लाकडी पट्टी दोच्याच्या साहाय्याने जमिनीला समांतर आडवी टांगली जाईल. तिला स्थिर होऊ द्या.
आता काय कराल ?? उजव्या हातात धातूची जड असलेली पट्टी धरा. तिच्या एका टोकाच्या बाजूने लाकडी पट्टीच्या मध्यभागी जोराने प्रहार करा.
काय दिसले?? दोरा नाजूक आणि बारीक आहे तुम्ही मारलेल्या दणक्याने वास्तविक दौरे
तुटायला हवे, पण दोरे न तुटता लाकडी पट्टीचे दोन तुकडे होतात.
हे कशामुळे होते??
वस्तू मूळ स्थितीत राहण्याच्या जडत्वाची ही प्रतिक्रिया आहे. लाकडी पट्टी दणक्याने खाली वाकण्याऐवजी तिची प्रतिक्रिया म्हणून ती मोडते व दोरे सहीसलामत राहतात.
यावरून काय समजले?? प्रत्येक वस्तूच्या अंगी जडत्वाचा गुण असतो.
एखादी वस्तू स्थिर असली तर जोपर्यंत तिच्यावर बाह्य बलाची क्रिया होत नाही तोपर्यंत ती स्थिरच राहते व एखादी वस्तू गतीत असेल तर तिच्यावर बाह्यबल जोपर्यंत कार्य करीत नाही तोपर्यंत ती गतिमानच राहते, हा जडत्वाचा नियम आहे.
प्रयोग क्रं-17
केशाकर्षण (capillary attraction) पाणी वाहते कसे?
काय हवे??
साहित्य : दोन काचेचे ग्लास/पेला, दिव्याची वात दीड फुट, पाणी.
काय करायचे??
कृती : काचेचा ग्लास घ्या. त्याला जमिनीपासून ७-८ इंच उंचीवर ठेवा. त्याला उंच बैठक म्हणून लाकडी ठोकळा किंवा जाड अशी पुस्तके वापरा. दुसरा काचेचा ग्लास जमिनीवर सरळ उभा ठेवा. दिव्याची वात घेऊन तिचे एक टोक वरच्या पेल्याच्या तळापर्यंत जाऊ द्या. वातीचे दुसरे टोक जमिनीवरील पेल्यात ठेवा. वरच्या पेल्यात हळूहळू पाणी ओतून पेला पाण्याने पूर्ण भरा.
काय दिसते ??
निरीक्षण – थोड्याच वेळात ग्लासातील पाणी वातीत वाहू लागते व वात भिजत जाते. संपूर्ण
वात भिजल्यानंतर हळूहळू जमिनीवरील पेल्यात पाणी जमा होत जाते.
यावरून काय समजले??
पदार्थांच्या कनात अतिसूक्ष्म पोकळी असते. या पोकळी यांचे जाळे पूर्ण पदार्थात असते. हा पदार्थ अंशतः एखाद्या द्रवात बुडविला तर या पोकळीत द्रव पदार्थ ओढला जातो. एका पोकळीतून शेजारच्या पोकळीत असा प्रवास करीत हा द्रव पदार्थ मूळ द्रवपदार्थाची पातळी ओलांडून वर चढतो व चढत चढत शेवटी त्या पदार्थाच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचतो, यालाच केशाकर्षण असे म्हणतात.
उदा. दिव्याच्या बाती तेल वर चढणे, खडूच्या कांडीत पाणी चढणे, झाड/रोपटे जमिनीतील पाणी व द्रवरूप पोषक द्रव्ये मुळांद्वारे वर ओढून घेतात.
प्रयोग क्रं -18
पाण्याचा दाब – बादलीतील कारंजे
काय पाहिजे??
साहित्य : पाणी ठेवण्याची प्लॅस्टिकची बाटली, बॉलपेनच्या रिकाम्या रिफीलचा तुकडा, पाण्याने भरलेली बादली.
काय करायचे??
कृती : पाणी ठेवण्याची प्लॅस्टिकची रिकामी बाटली घ्या. तिच्या बुडाला बारीक खिळ्याने रिफील घट्ट बसेल एवढे छिद्र पाडा. रिकाम्या रिफीलचा पाच इंच लांबीचा तुकडा कापून घ्या. बाटलीच्या बुडात पाडलेल्या छिद्रात तो खोचून घट्ट बसवा. रिफीलच्या तुकड्याचा जास्त लांबीचा भाग बाटलीत जाऊ द्या. बुडाच्या बाहेरकिंचित भाग ठेवा. या बाटलीला घट्ट बूच बसवा व बाटली बादलीतील पाण्यात सरळ उभी धरून बाटलीच्या गळ्यापर्यंत बुडवा. रिफीलच्या आतील टोकाकडे पाहा. बाटलीचे बूच सैल करून काढून घ्या.
* काय दिसते ??
रिफीलच्या टोकातून पाण्याचा फवारा उडणे सुरू होईल. बराच वेळपर्यंत हे पाण्याचे कारंजे उडत राहील.
हे कशामुळे झाले ??
बाटली पाण्यात बुडविली असता तिच्यात पाणी शिरत नाही. कारण बूच घट्ट बसविलेले असते व बाटलीतील हवा बाहेर जाण्याचा दुसरा नसतो. जेव्हा बूच आपण काढून घेतो त्यावेळी हवेला
बाहेर जाण्याचा मार्ग सापडतो व
पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे रिफीलमधून पाणी जोराने आत शिरते व बाटलीत कारंजे
उडणे सुरू होते.
यावरून काय समजले??
पाण्यात जितके खोल जाऊ तितका पाण्याचा दाब वाढत जातो. पाण्याच्या पृष्ठभागावर दाब
कमी असतो व आतमध्ये दाब जास्त असतो. या
दाबाचा उपयोग करून एक मजेदार खेळणे आपण तयार करू.
प्रयोग क्रं – 19 डोळा व मेंदू यांच्या एकत्रित कार्याने प्रतिमा तयार होते/दिसते हाताला छिद्र पाडा काय पाहिजे??
साहित्य – A4 आकाराचा कागद किंवा वर्तमानपत्राचा अर्धा कागद, चिकटपट्टी इ
काय करायचे??
कृती – एक A4 आकाराचा कागद घ्या (वर्तमानपत्राचा अर्धा कागदही चालेल). त्याची लांब नळी गुंडाळून घ्या. नळीचा व्यास साधारण 2 सेमी आणि लांबी साधारण 30 सेमी असेल ती उलगडू नये म्हणून चिकटपट्टी लावा. ही नळी उजव्या हातात पकडा डावा डोळा बंद करून नळीतून उजव्या डोळ्याने लांबचे दृश्य पहा. डावा डोळा बंदच ठेवा. आता नळीच्या अर्ध्या लांबीवर डावा तळहात टेकवा. हळूहळू डावा डोळा उघडा दोन्ही डोळे उघडे ठेवा,
तुम्हाला काय दिसते??
डाव्या हाताच्या पंजाला एक छिद्र असून त्यातून तुम्ही लांबचे दृश्य पाहत आहात असे तुम्हाला
दिसेल !
आता काय कराल??
आता डावा डोळा मिटून, उजव्या डोळ्याने बळीतून लांबवर पहा. आता उजवा डोळा मिटून, डाव्या डोळ्याने पहा.
नळीची दिशा कुणीकडे आहे? एक एक डोळा काय पाहतो, ते शोधून काढा.
हे कशामुळे झाले??
आपण फक्त डोळ्यांनी पाहत नाही. प्रत्येक डोळा वेगळ्या ठिकाणी असल्याने, त्यांना दिसणारे दृश्य किंचित वेगळे असते. पण आपला मेंदू या दृश्यांचे एकत्रीकरण करतो. तेच दृश्य
आपल्याला दिसत असते.
यावरून काय समजले??
या प्रयोगात आपल्याला दिसते ती प्रतिमा, म्हणजे आपल्या मेंदूने एकत्र केलेली दोन डोळ्यांना दिसणारी दोन वेगवेगळी दृश्ये आहेत. आपण आपले डोळे आणि मेंदू या सर्वांनी पाहतो, असे म्हणायला हवे.
प्रयोग क्रं -20 पाण्याच्या कणामधील आकर्षण व गुरुत्वाकर्षण शक्ती : रूपयाभर पाणी
काय हवे??
साहित्य – एक रुपयाचे नाणे, पेलाभर पाणी, ड्रॉपर
काय करायचे??
कृती – एक रूपयाचे नाणे सपाट पृष्ठभागावर ठेवा. शाई भरण्याच्या स्वच्छ ड्रॉपरमध्ये पाणी भरा. त्यातून एक थेंब पाणी नाण्याच्या मध्यावर टाका. त्याच्यावर आणखी थेंब पाणी टाका.
काय दिसते??
नाण्यावरून न सांडता किती थेंब पाणी नाण्यावर साचेल याचा अंदाज करा
काय दिसते ??
तुमच्या अंदाजापेक्षा किती तरी अधिक पाणी नाण्यावर सामावेल.
हे कशामुळे झाले??
पाण्याच्या थेंबामध्ये परस्परांना जोडून घेण्याचा जोर असतो, तो गुरुत्त्वाकर्षणापेक्षा कमी झाला पाणी ओसंडून वाहू लागते.
प्रयोग क्रं -21 कागदावरचा अदृश्य संदेश वाचा
तुम्हाला हवेः- अर्धी बशी लिंबाचा रस, एक चमचा पाणी, कापसाचा छोटा बोळा, पांढरा
कागद, बल्ब.
काय कराल? : एका बशीमध्ये लिंबाचा रस घ्या.
त्यामध्ये काही थेंब पाणी टाकून एकत्र करा. आता कापसाचा छोटा बोळा त्या लिंबाच्या रसात बुडवा. नंतर हाच बोळा पांढऱ्या कागदावर संदेश लिहिण्यासाठी वापरा. जेव्हा तुम्ही लिहिलेली अक्षरं सुकतील तेव्हा ती अदृश्य होतील.
आश्चर्य वाटलं ना!
जेव्हा तुम्हाला हा संदेश वाचायचा असेल तेव्हा कागद बल्बजवळ धरून गरम करा.
आणि अजूनच आश्चर्यचकित व्हा!!
काय घडते ? : तुम्ही लिहिलेला संदेश कागदावर उमटलेला असेल !
का घडते ? : लिंबाच्या आणि इतर काही फळांच्या रसात कार्बनची संयुगं असतात. ही संयुगं पाण्यात मिसळता तेव्हा ती रंगहीन होतात; पण जेव्हा तुम्ही कागदाला उष्णता तेव्हा संयुगांमधून कार्बन मोकळा होतो आणि काळ्या रंगाची अक्षरं
प्रयोग क्रं -22 घरी तयार करा प्लॅस्टिक !
तुम्हाला हवे
अर्धा पेला (१२५ मिली) दूध, दूध तापवण्याचे भांडे, लहान स्वच्छ बरणी, १ चमचा लिंबाचा रस. काय कराल? : दुधात आधी चमचाभर लिंबाचा रस मिसळा. आता भांड्यात दूध गरम करा. जोपर्यंत दूध फाटून दह्यासारखा घट्ट गोळा तयार होत नाही तोपर्यंत ते सतत हलवत राहा. आता हा दूध फाटून तयार झालेला द्रव बरणीत ओता. त्यावर पाणी असल्यास ते गाळून घ्या. तयार झालेला गोळा बरणीत तासभर तसाच राहू या.
काय घडेल ? : बरणीत एक चिवट गोळा तयार होईल. त्यातील पातळ पाण्यासारखा द्रव हळूहळू बाहेर टाका. आता त्या चिवट गोळ्याला चेंडूचा किंवा चेहऱ्याचा किंवा तुम्हाला हवा तो आकार घा. तो कडक होण्यासाठी काही तास त्याला तसाच उघड्या बरणीत राहू द्या किंवा कागदावर ठेवा. हवं तर तुम्ही त्याला अॅक्रेलिक रंगांनी रंगवूही शकता.
का? : जेव्हा लिंबाचा रस आणि दूध परस्परांशी प्रक्रिया करतात तेव्हा दूध द्रव आणि घन पदार्थात विभागले जाते. हा घन पदार्थ खिग्ध पदार्थ, खनिजं आणि कॅसेन प्रथिन (लांबट मूलद्रव्यांनी बनलेले आणि कडक होत नाहीत तोवर बरासारखे वळणारे पदार्थ) यापासून बनलेला असतो.
पूर्वी दूध आणि झाडापासून प्लॅस्टिक बनवलं जायचं. आता ते खनिज तेलांपासून बनवलं पण हे पेट्रोलियम प्लॅस्टिक त्याच्या विघटन न होण्याच्या गुणधर्मामुळे सध्या मोठी समस्या बनलं आहे.