इ.१० वी १२ वी विद्यार्थ्यांच्या १७ नंबर फॉर्मची नावनोंदणी प्रक्रियेबाबत परीपत्रक 17th number form
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट (अर्ज क. १७ अन्वये) होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेबाबत.
महोदय,
मंडळामार्फत फेब्रु मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस खाजगीरित्या (अर्ज क. १७) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावनोंदणी प्रक्रियेबाबतचे प्रकटन या पत्रासोबत जोडलेले आहे. सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.