मार्च २०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत 10th result certificate
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, मार्च २०२४ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांनी सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना मंगळवार दिनांक ११/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता करावयाचे असून माध्यमिक शाळांनी त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करावयाचे आहे. त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे.
सदर बाब विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व संबंधित माध्यमिक शाळांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावी व त्याची प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.