जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत ZPFMS

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत ZPFMS

संदर्भ – शासनाचे समक्रमांकाचे दि.०२.०४.२०२४ रोजीचे पत्र.

महोदय/महोदया,

विषयांकित प्रकरणी संदर्भाकित दि.०२.०४.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनाने जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विहित मुदतीत सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी कार्यवाही करणे अपेक्षित होते. तथापि, बहुतांश अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा लोकसभा निवडणूकीच्या कामासाठी अधिग्रहित केल्या असल्याने तसेच दि. ३१.०३.२०२४ रोजी सादर केलेल्या देयकांचे कोषागार कार्यालयाकडून अद्याप धनादेश प्राप्त न झाल्याने लेखांकन प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची विनंती अनेक जिल्हा परिषदांकडून शासनास प्राप्त झाली आहे.

वरील बाब विचारात घेऊन संदर्भाकित दि. २.०४.२०२४ रोजीच्या पत्रातील मुद्दा क्र. १ व २ येथील लेखांकन प्रक्रियेकरिता खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त उपरोक्त पत्रान्वये अन्य लेखाविषयक बाबींकरिता विहित केलेल्या कालमर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद स्तर व पंचायत समितीस्तरः-

१. कोषागारातून प्राप्त होणारे रकमांचे लेखांकन पुर्ण करणे त्यानुषंगाने देयकांची जमा व खर्चाची ताळमेळ पुर्ण करण्याची कार्यवाही ही दिनांक २९ एप्रिल, २०२४ पर्यंत पुर्ण करण्यात यावी.

२. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाने व पंचायत समितीतील वित्त विभागाने

लेखांकन पुर्ण करण्याची कार्यवाही ही दिनांक ३० एप्रिल, २०२४ पर्यंत पुर्ण

करावी.

ZPFMS
ZPFMS

Leave a Comment