शिक्षकांचे वेतन विलंबाने करणे पडले महागात बीडीओंकडून बीईओंना कारणे दाखवा नोटीस vetan vilamb
चिखलदरा, १९ जानेवारी चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे नियमित माहे डिसेंबरचे वेतन इतर पंचायत समितीच्या तुलनेत नेहमीप्रमाणे तरतूद प्राप्त होऊनही एका आठवड्याच्या विलंबाने केल्याने याबाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेने केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन ‘प्रशासनाच्या लालफीतशाहीत शिक्षकांचे वेतन रखडले’ अशा मथळ्याची बातमी ‘तरुण भारत’मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जीवनलाल भिलावेकर यांनी शिक्षण विभागाला अखेर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
न्यूज पेपर pdf येथे पहा
👉PDF download
दोषींवर जबाबदारी निश्चित करून अहवाल देण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. चिखलदरा पंचायत समिती
अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे व केंद्रप्रमुखांचे वेतन नेहमीच विलंबाने होत असल्याची तक्रार प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी शिक्षकांच्या प्राप्त तक्रारीवरून जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे केली होती. या प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच गटविकास अधिकारी जीवनलाल भिलावेकर यांनी १९
जानेवारी रोजी पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून वेतन विलंबाबाबत कारणीभूत असणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईने पंचायत समिती शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली असून संबंधित कनिष्ठ लिपिक चांगलेच धास्तावले आहेत.
नोटीसमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, चिखलदरा पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत नेहमीच शिक्षकांचे व केंद्रप्रमुख यांचे वेतन अदा करण्यात दिरंगाई होते. वेतन वेळेवर होत नाही, असे निदर्शनास येत आहे. शिक्षकांचे वेतन देयक
यापूर्वी दिली होती नोटीस
शिक्षकांच्या वेतन विलंबाबाबत यापूर्वी देखील तत्कालीन गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिकांना कारणे दाखवा नोटीस ऑगस्टमध्ये बजावली होती. मात्र या नोटीसचा फारसा परिणाम न झाल्याचे दिसून येते. या कामी आपली उदासीनता कनिष्ठ लिपिकांनी पुन्हा सिद्ध केली आहे. त्यामुळे या नोटीसचा सुद्धा परिणाम होईल की नाही, याबाबत शिक्षकांना खात्री नाही.
विहित मुदतीत सदर न केल्याने कारवाई करण्याच्या सूचना या नोटीसमध्ये दिल्या आहेत. या वृत्ताची दखल घेतल्यामुळे शिक्षकांनी आभार व्यक्त केले आहे. ◀ (तभा वृत्तसेवा)