सिंधुदुर्गातील गणित,विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना एस-१४ वेतनश्रेणी मिळणार vetan grade pay 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सिंधुदुर्गातील गणित, विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना एस-१४ वेतनश्रेणी मिळणार vetan grade pay

ओरोस : पुढारी वृत्तसेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणित व विज्ञान विषय पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी ( एस-१४) बाबत प्राथ. शिक्षक समितीकडून गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा व आंदोलन करण्यात येत आहेत. या वेतनश्रेणीबाबत निर्णयक स्थितीवर प्राथ. शिक्षण विभाग प्रशासन आले असताना अद्यापही कार्यवाही झालेली नाही. या प्रश्नी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने १५ मार्च रोजी ग्रामविकास विभाग कक्ष अधिकारी दिपाली पवार यांची भेट घेऊन चर्चा केली असता श्रीमती पवार यांनी जि. प. प्राथ. शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रश्नी उचित कार्यवाहीचे निर्देश दिले. यामुळे जिल्ह्यातील गणित व विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना

एस- १४ वेतनश्रेणी लवकरच मिळणार असल्याची माहिती प्राथ. शिक्षक समितीचे राज्य राजन सरचिटणीस कोरगावकर यांनी दिली आहे.

प्राथमिक शिक्षक समिती राज्यशाखा व तत्कालीन जिल्हा शाखेकडून २६ डिसेंबर २३ रोजी या विषयाबाबत ग्रामविकास विभाग उपसचिव यांचेकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. या निवेदनाची दखल घेत उपसचिव ग्रामविकास विभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि .प. सिंधुदुर्ग यांना १५ जानेवारी रोजी पत्र निर्गमित करून संबंधित विषय पदवीधर पात्र शिक्षकांना पदवीधर

वेतनश्रेणी एस-१४ तात्काळ देण्यात यावी असे सूचित केले. परंतु अद्यापपर्यंत संबंधित शिक्षक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत याचेच दुःख वाटत आहे.

प्राथमिक शिक्षक समिती राज्य शाखेकडून १५ मार्च रोजी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष विजय येलवे आदी शिष्टमंडळाने ग्रामविकास विभागातील कक्ष अधिकारी दिपाली पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपसचिव पो. द. देशमुख यांचे १५ जानेवारीच्या पत्राची कार्यवाही सिंधुदुर्ग जि. प. शिक्षण विभागाकडून अद्यापपर्यंत झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर कक्ष अधिकारी दिपाली पवार यांनी

याचा माहिता

फोनवरून शिक्षणाधिकारी प्राथ. सिंधुदुर्ग यांचेशी चर्चा केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांचेशी चर्चा करून वेतनश्रेणीबाबत प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

विज्ञान, गणित विषय पदवीधर शिक्षक वेतनश्रेणीबाबत प्राथमिक शिक्षक समितीकडून संबधित शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे.

ग्रामविकास विभाग कक्ष अधिकारी दीपाली पवार यांचेसोबत झालेल्या राज्य शिक्षक समिती शिष्टमंडळाकडून झालेल्या चर्चेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विज्ञान, गणित विषय पदवीधर शिक्षकांना एस-१४ वेतनश्रेणी मिळण्याची पल्लवित झाली आहे.

vetan grade pay 
vetan grade pay

Leave a Comment