जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करतांना करावयाची वेतन निश्चिती varishth vetan shreni
जिल्हा परिषद आळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवड श्रेणी लागू करण्याबाबत शासन आदेश, ग्रा. वि. वि. क्रमांक-डीएसआर २४८९/प्र.क्र. ५२७/१८, दिनांक. ४.४.९० नुसार आदेश निर्गमित करण्यात आले आहे या आदेशासोबत जोडलेल्या प्रपशीत एकूण २८ संवर्गाच्या वरिष्ठ श्रेणी/ निवड श्रेण्या नमूद करण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठ श्रेणी मंजूर करण्याच्या संदभात संबंधीत कर्मचा-यांच्या कामाचे मूल्यमापनासाठी समितीचे गठण शासन निर्णय, ग्राविवि क्र. डीससआर २४९१/ २६१५/सीआर-१०/१८, दि. ११.२०९१ नुसार करण्यात आलेले आहे. वरिष्ठ श्रेणी मिळण्यास पात्र असलेल्या कर्मचा-यांत समितीच्या निर्णयानंतर वरिष्ठ श्रेणी मंजूर केल्यावर त्याची वरिष्ठ श्रेणीत वेतन निश्चिती करण्याबाबत निरनिराळ्या जिल्हा परिषदामध्येः प्रत्यक्षात एकसूत्रता नसल्याचे आढळून येते. वर नमूद केलेल्या आदेशानुसार संबंधित शिक्षकांत वरिष्ठ श्रेणी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची वरिष्ठ श्रेणीतील वेतन निश्चिती या विभागाच्या पत्र क्र. डीएसआर-२४९०/५० २७९/१८, दिनांक- २२.८.९० मध्ये [प्रत तंलग्न] केलेल्या खुलाशानुसार करणे आवश्यक आहे. तरी, तदर पत्रात्त स्पष्ट केल्याप्रमाणे शासन निर्णय, वित्त विभाग, कृ. वेतन-२२८९/प्र.क्र. ४६/ सेवा-३, दि. ३.४.९० व शासकीय परिपत्रक, वित्त विभाग क्र. वेतन-१२८९/प्र. ४६/सेवा-३, दि. १९०६.१९९० मधील आदेशानुसार संबंधीत शिक्षकांची वेतन निश्चिती करण्यात याची. सदर आदेशाच्या प्रति वित्त विभागाने सर्व जिल्हा परिषदांना या अगोदर पाठविलेल्या आहेत.