शिक्षकांना अन्य कामे नको समितीची शिफारस; धोरण निश्चितीकडे लक्ष uneducational work 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांना अन्य कामे नको समितीची शिफारस; धोरण निश्चितीकडे लक्ष uneducational work 

शिरोली पुलाची, ता. १३ : राज्यातील शिक्षकांना शिक्षण विभाग सोडून इतर विभागांची कामे देऊ नयेत, अशी महत्त्वाची शिफारस शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांसंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली आहे. समितीने अहवाल शिक्षण विभागाला सादर केला आहे. त्यामुळे या अहवालासंदर्भात शिक्षण विभाग काय धोरण निश्चित करणार, याबाबत शिक्षण क्षेत्रात उत्सुकता आहे.

वर्तमानपत्र कात्रण येथे पहा

👉PDF download

 

विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह सुमारे दिडशे अशैक्षणिक कामे करावी लागतात. यामध्ये जनगणना, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे, आदी अशैक्षणिक कामे करावी लागत असून, शिक्षण विभागाच्या नवनवीन धोरणानुसार त्यामध्ये वाढच होत आहे. शिक्षण हक्क कायद्यातील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक

कामे लावण्यास परवानगी नाही. राष्ट्रीय

दशवार्षिक जनगणना, निवडणूक

आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच

शिक्षकांना कामे देता येतात. मात्र,

अशैक्षणिक कामांमध्ये सातत्याने वाढ

होत आहे. या अशैक्षणिक कामांमुळे

शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत

असल्याचे सांगत शिक्षक संघटनांनी या

कामांना विरोध केला आहे. त्यामुळेच

नवसाक्षरता अभियानातील निरक्षरांच्या

सर्वेक्षणावरही शिक्षक संघटनांनी

बहिष्कार घातला आहे. परिणामी,

या अभियानाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांबाबत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला.

या अहवालामध्ये निवडणूक आणि जनगणना ही कामे सोडून शिक्षकांना शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांची कामे देऊ नयेत. शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असलेली कामे शिक्षकांना करावी लागतील. त्यात शिक्षण विभागाच्या अखत्यारितील कामे उदाहरणार्थ युडायस नोंदणी, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, शालेय पोषण आहार अशी कामे करावी लागतील. शालेय पोषण आहाराच्या अभिलेख्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी, अशी शिफारस केली आहे.

शिक्षकांना दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे 66 दुर्लक्ष होते. गरजेचे आहे. त्यामुळे अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची सुटका करणे

– विजयसिंह माने, अध्यक्ष, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप

शिक्षण विभागाकडून अनेक प्रकारची माहिती मागवली जाते. या ८८ माहितीचा आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याचा काहीही संबंध नसतो. या अशैक्षणिक कामांमुळे, शिक्षकांना प्रत्यक्ष शिकविण्यासाठी वेळ कमी मिळतो. – एस. डी. लाड, जिल्हाध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर

Leave a Comment