यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणाली मधील आधार नंबर उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणे बाबत udise plus
विषयः सन २०२३-२४ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमधील दि. १५/०२/२०२४ रोजीच्या अहवालानुसार आधार नंबर उपलब्ध न करून दिलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेबाबत.
संदर्भ: दिल्ली NIC सेंटर याचे दि. १५/०२/२०२४ रोजीच्या अहवालानुसार.
यु-डायस प्लस प्रणालीमधील दिनांक १५/०२/२०२४ च्या अहवालानुसार राज्यातील ५,५८,७४४ विद्यार्थ्यांचे आधार नंबर ९९९९ ९९९९ ९९९९ असे नोंदविलेले दिसुन येत आहेत.
भारत सरकारच्या सूचनेनुसार सदर विद्यार्थ्यांचे आधार नंबर विद्याथ्यांना प्राप्त झाले.
असल्यास त्या विद्यार्थ्यांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
तरी अशा विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ अद्ययावत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे.
सोबत : जिल्हानिहाय अहवाल.