मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक कर्तव्यासाठी त्यांना नेमूण दिलेल्या मतदारसंघात जाण्यासाठी केलेली बसेसच्या सुविधेबाबत  travelling for election duty  

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक कर्तव्यासाठी त्यांना नेमूण दिलेल्या मतदारसंघात जाण्यासाठी केलेली बसेसच्या सुविधेबाबत  travelling for election duty  

भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. सदरील निवडणूकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी यांना त्यांना नेमूण दिलेल्या मतदारसंघात घेऊन जाण्यासाठी वाहतुक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील खालीप्रमाणे सूचना –

१. १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी (८५-भोकर, ८६-नांदेड उत्तर, ८७- दक्षिण नांदेड, ८९-नायगांव, ९०- देगलुर व ९१-मुखेड) व १५-हिगोली लोकसभा मतदारसंघ (८३-किनवट व ८४- हदगांव) साठी दि.२६/०४/२०२४ रोजी मतदान पार पडणार आहे.

२. दि.२४/०४/२०२४ रोजी वर नमुद केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी तिसरे प्रशिक्षण आयोजित केले आहे व दि.२५/०४/२०२४ रोजी मतदान केंद्रावर मतदान पथके रवाना होणार आहेत.

३. दि.२४/०४/२०२४ रोजी तिसरे प्रशिक्षणाला होणार होण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना त्यांना नेमूण दिलेल्या मतदारसंघात घेऊन जाण्यासाठी बसेसची सुविधा करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड कळविले आहे.

४. करीता ज्यांना तिसरे प्रशिक्षणासाळी जावयाचे आहे अशांना दि. २४/०४/२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता खालील नमुद केलेल्या ठिकाणावरुन त्यांना नेमूण दिलेल्या मतदारसंघात जाण्यासाठी उपस्थित राहावे.

१. शासकीय आयटीआय, गोकुदा, किनवट

२. समाजकल्याण विभागाचे मागासवर्गीय मुर्लीचे शासकीय वसतिगृह,

बुध्दभुमी वसाहत, तामसा रोड, नांदेड

. शासकीय मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह, भोकर ३

४. शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड

५. पंचायत समिती तहसिल कार्यालय परिसर, लोहा

६ ७

. शासकीय आयटीआय, नायगांव

. तहसिल कार्यालय, देगलुर

८. मुख्य प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, मुखेड

५. तसेच दि.२६/०४/२०२४ रोजी रात्री १०.०० वाजेनंतर मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर संबंधीत मतदारसंघाच्या मतदान साहित्य स्विकृति केंद्रावरुन मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना परत येण्यासाठी सुध्दा बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी संबंधीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेशी संपर्क करावा. असे आवाहन श्री. अभिजित राऊत (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

travelling for election duty  
travelling for election duty

Leave a Comment