“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक time table of my beautiful school 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक time table of my beautiful school 

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” हे अभियान राबविण्यासाठी दि. ३०.११.२०२३ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा वेळापत्रक येथे पहा

👉👉pdf download 

 

२/- या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांच्या अनुषंगाने प्रत्येक टण्यावरील उपक्रम हे विहित कालावधीत पार पाडण्यासाठी व करावयाच्या कार्यवाहीबाबत सुस्पष्टता येण्यासाठी संदर्भीय पत्रान्वये विविध जबाबदा-या निश्चित करुन व सूचना तसेच व्हीसीव्दारे घेतलेल्या बैठकीमधून आवश्यक ते मार्गदर्शन व निर्देश देण्यात आलेले आहेत.

माझी शाळा सुंदर शाळा गुणांकन प्रपत्र येथे पहा

👉👉pdf download 

 

३/- या अभियानाच्या अनुषंगाने शाळांना माहिती भरण्यासाठी सरल मधील शाळा पोर्टलव्दारे टॅब उपलब्ध करुन देऊन माहिती भरण्यात येत आहे. तसेच संदर्भ क्र.११ वरील पत्रान्वये शाळांकडून माहिती भरताना येणा-या अडणींची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, मनपा स्तर, विभाग स्तर, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दिनांक ३०.११.२०२३ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.

५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थिती बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही, याची देखील नोंद घ्यावी. या बाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे, त्याकरीता आवश्यकतेनुसर सर्व मनुष्यबळाचा वापर करुन शाळांकडून माहिती भरण्याची व सर्व स्तरावरील मूल्यांकन हे विहित वेळापत्रकाप्रमाणेच पूर्ण करुन अभियान यशस्वी पार पाडले जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

सोबत : शाळा मूल्यांकन वेळापत्रक

Leave a Comment