दरमहा पगार वेळेवर होईना; शिक्षकांचे अर्थकारण बिघडले! बजेट अन् तांत्रिक अडचणी; शासनाच्या निर्देशाचेही होईना पालन teacher’s payment
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : जिल्हा परिषदांच्या तसेच
खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सातत्याने विलंब होत आहे. सीएमपी प्रणालीत होत असलेल्या अडचणी व शासनाकडून बजेट मंजूर होत नसल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी शाळेतील २८ हजार ५०० शिक्षकांच्या वेतनाला दर महिन्याला उशीर होत आहे. मार्च महिन्यातील प्राथमिक विभागाचे वेतन १२ दिवसांनंतर झाले असला तरी अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे वेतन झाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. शिवाय खासगीच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकवणारे हजारो शिक्षक आहेत. पूर्वी शिक्षकांचे वेतन शाळेतील मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा होत होते. तेथून मुख्याध्यापक संबंधित शिक्षकांच्या खात्यावर वेतन जमा करत. मात्र, सध्या शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते. या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांतील त्रुटींमुळे वेतन अदा करण्यास सातत्याने विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
शासनाच्या निर्देशाचेही झाले नाही पालन
मध्यंतरी शासनाने रमजान ईद व गुढीपाडव्यापूर्वी शिक्षकांचा पगार करावा, असे
निर्देश दिले होते. गुढीपाडवा झाला, रमजान ईदही साजरी झाली. मात्र तरीही
शिक्षकांचा पगार वेळेवर झाला नाही. शासनाच्या निर्देशाचेही पालन होत
नसल्याची खंत शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील शिक्षकांची स्थिती
‘खासगी माध्यमिक’चे शिक्षक १४,००० दर महिन्याला अंदाजे वेतन ८२ कोटी खासगी प्राथमिक व इतर २७०० महिन्याला अंदाजे वेतनासाठी १७ कोटी झेडपी शाळांवरील शिक्षक ८५०० दरमहा वेतनाची रक्कम ९३ कोटी
शासन
परिपत्रकानुसार शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला झाले पाहिजे. वेतन उशिरा होत असल्याने प्राथमिक शिक्षकांना कर्जासाठी नाहक व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. उशिरा वेतन झाल्याने अनेकांचे सिबिल खराब होत आहे. हा महिना सणासुदीचा असतानाही वेतन शिक्षकांच्या खात्यात उशिरा जमा झाले.
दर महिन्याच्या १ तारखेला होणार शिक्षकांचा पगार १२ तारीख ओलांडली तरी झालेला नाही. सातत्याने शिक्षकांच्या वेतनाला उशीर होत आहे. वेळेवर पगार व्हावा, यासाठी आमच्या संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. वेळेवर पगार होत नसेल तर आम्ही कडक भूमिका घेऊ. – सचिन नागटिळक प्रहार शिक्षक संघटना, सोलापून
शिक्षकांचा पगार वेळेवर व्हावा, यासाठी शिक्षक भारती संघटना सातत्याने वेतन अधीक्षकांच्या संपर्कात आहे. चर्चा, बैठका, निवेदन देऊनही शिक्षकांचा पगार वेळेवर होत नाही. शिक्षण विभाग शिक्षकांचा पगार वेळेवर करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. भविष्यात शिक्षक भारती आक्रमक पवित्रा घेईल.